माजी आमदार विजयराज शिंदेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

आजवर तीन वेळा आमदार राहिलेले विजयराज शिंदे शिवसेना उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र उप जिल्हाप्रमुख संजय गायकवाड यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. 

बुलडाणा : शिवसेनेचे विधानसभेचे इच्छुक विजयराज शिंदे यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन अपक्ष म्हणून शुक्रवारी (ता. 4) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांकडून त्यांनी वंचित बहुजन आघाडी कडून निवडणुक लढविन्यचा आग्रह केला जात आहे. 

ओवेसी म्हणतात, 'मैं उन्हे गोद मैं उठाने के लिए तयार हूँ'

आजवर तीन वेळा आमदार राहिलेले विजयराज शिंदे शिवसेना उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र उप जिल्हाप्रमुख संजय गायकवाड यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. गायकवाड व विजयराज शिंदे हे कट्टर विरोधक आहेत. जिल्ह्यात शिवसेनेत शिंदे व खासदार प्रतापराव जाधव असे दोन गट आहेत.

Vidhan Sabha 2019 : पवारसाहेबांसमोर मी नतमस्तक; आव्हाड भावूक

गेल्या पाच वर्षांत शिंदे हे शिवसेनेत एकटे पडले होते. खासदार गटाकडून त्यांना पक्षच्या एकाही कार्यक्रमाला बोलावले जात नव्हते. त्यांच्याकडे पक्षाची कोणतीही जबाबदारी नव्हती. शेवटपर्यंत प्रयत्न करुनही पक्षाने खासदार गटाच्या संजय गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने शिंदे समर्थकांनी तिव्र नाराजी व्यक्त करुन अपक्ष किंवा वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन बंडाचे निशाण उभारले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former shivsena MLA leaves party