राष्ट्राला एका सूत्रात बांधणारी ‘हिंदी’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016

नागपूर - आसेतुहिमाचल बोलल्या जाणाऱ्या हिंदी भाषेमुळे राष्ट्र एका सूत्रात बांधले गेले आहे. कारण भारत हा बहुभाषिक देश आहे. प्रत्येक प्रांताची भाषा वेगळी आहे. परंतु हिंदीमुळे विविध प्रांतांतील नागरिक एकमेकांशी संवाद साधू शकतात. हिंदीचे अस्तित्व देशाच्या अखंडतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया हिंदी भाषक नागरिकांनी व्यक्‍त केली. १४ सप्टेंबर या हिंदी भाषी दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील हिंदी भाषकांशी ‘सकाळ’ने संवाद साधला.

हिंदीचे भविष्य आशादायी

नागपूर हा मध्य भारतातील प्रांत असल्याने येथे हिंदी मोठ्या प्रमाणात बोलली जाते. नागपूर आणि विदर्भात हिंदी साहित्याची निर्मितीही अनेक वर्षांपासून होते आहे. मुक्‍तिबोध, विद्याकुमारी चव्हाण, पन्नालालजी बक्षी या वैदर्भी साहित्यिकांनी हिंदी साहित्यात मोलाची भर घातली आहे. आजही हिंदीत दर्जेदार साहित्य निर्मिती होते आहे. हिंदी अलीकडे केवळ उत्तर प्रांतापुरती सीमित राहिली नसून, पूर्वोत्तर राज्यांमध्येही हिंदीचा बोलबाला आहे. हिंदीच्या लोकप्रियतेचे श्रेय मी माध्यमांना आणि हिंदी चित्रपटांना देतो.

- अनुपकुमार, विभागीय आयुक्‍त आणि हिंदी साहित्यिक

हिंदी संस्कृतीचे प्रतीक

भाषा हे संपर्काचे साधन आहे. प्रत्येक भाषा आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. त्यामुळे भाषेवरून होणारे भेदभाव योग्य नाहीत. अलीकडे इंग्रजीचे प्राबल्य वाढले असले तरी हिंदी भाषा ही संस्कृतीचे प्रतीक आहे आणि त्याचे महत्त्व अबाधित आहे. हिंदीच्या प्रसार आणि प्रचाराकरिता आम्ही सातत्याने प्रयत्न करीत असतो. नाट्यमहोत्सव, कविसंमेलन, चर्चा अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत हिंदी पोहोचविण्याचा प्रयत्न करतो आहोत.

- उमेश चौबे, विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाचे उपाध्यक्ष

हिंदी हृदयाची भाषा

सातव्या शतकापासून प्रवाहित झालेली हिंदी भाषा आजही आपली अस्मिता कायम राखून आहे. याचे कारण हिंदी भाषेने स्वीकारलेली लवचिकता. भारतासारख्या बहुभाषी देशात हिंदीने विविध भाषांमधले शब्द आपल्यात सामावून घेतले. इंग्रजीही याला अपवाद नाही. त्यामुळे हिंदी अधिक समृद्ध होत गेली. ग्लोबलायझेशनच्या काळात आणि ई-साहित्याच्या काळात हिंदीचा वापर अधिक वाढला. अनेक मंडळी हिंदीत ब्लॉग लिहितात. इंटरनेटवरही हिंदीचा प्रभाव दिसतो. परदेशातील ३५ ते ४० विद्यापीठांमध्ये हिदी विषय शिकविला जातो. हिंदी ही जाहिरातींची भाषा आहे, व्यापाराची भाषा आहे, माध्यमांची भाषा आहे आणि चित्रपटाचीही भाषा आहे. त्यामुळे हिंदी ही हृदयाची भाषा आहे. 

- वीणा दाढे, हिंदी विभागप्रमुख

Web Title: A formula to build the nation 'Hindi'