चोरट्यांनी केले एसटीला टार्गेट! उभ्या बसमधून ४६ हजारांचे डीझेल चोरी

Forty six thousand diesel stolen from a vertical bus amravati crime news
Forty six thousand diesel stolen from a vertical bus amravati crime news

तिवसा (जि. अमरावती) : शहरातील राष्ट्रीय महामार्ग लागत असलेल्या बसस्थानकातून काल रात्री दोन वाजताच्या सुमारास बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमधून सहाशे लिटरच्यावर डिझेल चोरी गेल्याची घटना सकाळी उघडकीस आली. बसस्थानकात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. तिवसा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सध्या सर्वत्र थंडीचा जोर वाढत आहे. शहरातील रस्ते नऊ वाजताच सामसूम होत आहेत. याचा फायदा घेत भुरट्या चोरांसह अट्टल चोरट्यांकडून मोठ्या घरफोडी, दुचाकी चोरी व इतर चोरीच्या घटना वाढत आहेत. काल तिवसा बस स्थानकाला लक्ष करीत चोरट्यांनी उभ्या असलेल्या बसमधून डिझेल चोरीची घटना समोर आली.

बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजनुसार व डेपो मॅनेजर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास बस स्थानकात चारचाकी वाहनाने तीन चोरटे शिरले. बस स्थानकात उभ्या असलेल्या चार बसेसमधून ४६ हजार ३११ रुपयांचे सहाशे लिटर डिझेल चोरी करून पसार झाले. बसस्थानकात असलेले सुरक्षारक्षक झोपेत असल्याने चोरटे पळ काढण्यात यशस्वी झाले.

सकाळी घटना उघडकीस येताच याची माहिती तिवसा पोलिसांना देण्यात आली. तेव्हा पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

पुढील तपास सुरू
बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये तीन व्यक्ती डिझेल चोरी करताना आढळून आले. याठिकाणी पंचनामा करून माहिती स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.
- वर्षा वंजारी,
एपीआय, तिवसा पोलिस स्टेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com