जिल्ह्यात आढळले 44 क्षयरुग्ण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

एकीकडे जिल्हा क्षयरुग्ण मुक्त करण्याची मोहीम राबविली जात असाताना या मोहिमेला धक्का देणारी माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यात तब्बल ४४ क्षयरुग्ण आढळून आले असून, त्यांना तातडीने आैषधोपचार सुरू करण्यात आला आहे.
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियत्रण कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने राब

अकोला - एकीकडे जिल्हा क्षयरुग्ण मुक्त करण्याची मोहीम राबविली जात असाताना या मोहिमेला धक्का देणारी माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यात तब्बल 44 क्षयरुग्ण आढळून आले असून, त्यांना तातडीने आैषधोपचार सुरू करण्यात आला आहे.

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविला जात आहे. जिल्हा ‘क्षयरोग मुक्त 2020’ ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत जिल्ह्यात करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान 44 क्षयरुग्ण आढळून आले. त्यांना त्वरीत औषधोपचार सुरु करण्यात आला. या मोहिमेत आढळलेल्या काही जोखीमेच्या भागात सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम 18 ते 30 जून 2018 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत गाव, वाड्या-वस्त्या, अती जोखमीचा भाग, खाण कामगार, विटभट्टी कामगार, जीन कामगार, अनाथालय, वृध्द आश्रम इत्यादी ठिकाणी गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांना मोफत औषोधोपचार सुरू केला जाणार आहे.

तीन टप्प्यात मोहीम
क्षयरुग्ण तपासणी मोहीम तीन टप्यात राबविली जाणार आहे. मोहिमेचा पहिला टप्पा 18 ते 30 जून, दुसरा टप्पा 01 ते 12 सप्टेंबर आणि तिसरा टप्पा 10 ते 21 डिसेंबर दरम्यान राबविला जाईल.

घरोघरी होणार तपासणी
या मोहिमेमध्ये क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य कर्मचारी आशा, अंगणवाडी सेविका व सामाजिक कार्यकर्ते यांचेमार्फत घरोघरी जाऊन जोखीमग्रस्त भागातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

ही आहेत लक्षणे

  • दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला.
  • दोन आठवड्यापेक्षा जास्त मुदतीचा ताप.
  • तीन महिन्यांमध्ये वजनात लक्षणीय घट.
  • सहा महिन्याच्या कालावधित कधीही थुंकीवाटे रक्त पडत असल्यास.
  • एक महिन्यापासून छातीत दुखणे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने 9 एप्रिल ते 8 मे या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात 44 रुग्ण आढळले. रुग्ण आढळलेला भाग अतिजोखमीचा असल्याने येथे तीन टप्प्यात तपासणी मोहीम राबविली जाईल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मेघा गोळे यांनी सांगितले आहे.

Web Title: Found in the district, 44 tuberculosis