गोठा कोसळून चार जनावरांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यात गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मातीच्या घरे आणि जनावरांचे गोठे कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. रानबोथली येथे शुक्रवारी (ता.13) पहाटे पाच वाजता जनावरांचा गोठा आणि घराची भिंत कोसळून चार जनावरे जागीच ठार झाले.

धनराज नाकतोडे यांचा हा गोठा आहे. घटनेत दोन बैल, एक गाय आणि गोर्ह्याचा मृत्यू झाला. यात जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नाकतोडे यांची पत्नी साफसफाई करण्यासाठी गोठ्यात जाण्याच्या तयारीत होती. त्याचवेळी गोठा कोसळला. गोठा मातीचा होता. त्यात लाकडाचा वापर करण्यात आला होता. तीच लाकडे आणि माती अंगावर कोसळल्याने जनावरांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाकडे नागरिकांची धाव घेतली आणि जनावरांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four animals killed in collapse