आनंद साई'च्या अध्यक्षासह चौघांना अटक

file photo
file photo

नागपूर : हुडकेश्‍वर हद्दीतील आनंद साई अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत 4.96 कोटींच्या अपहाराचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी सोसायटीच्या पाच संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, संस्थेच्या अध्यक्षासह चौघांना पोलिसांनी अटक केली. संचालक तृप्ती घोगरे हिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्‍यता आहे.
अध्यक्ष मिलिंद घोगरे (42, रा. अयोध्यानगर), संजय भगत (49, रा. श्रीमहालक्ष्मीनगर, नरसाळा), धीरज नगरकर (43, रा. संजय गांधीनगर, रिंगरोडजवळ) आणि ज्ञानेश्‍वर उमरेडकर (57, रा. हाउसिंग बोर्ड कॉलनी सुजातानगर, बिनाकी ले-आउट) अशी आरोपींची नावे आहेत. जिल्हा विशेष लेखा परीक्षक विभागाच्या पडताळणीत हा अपहार समोर आला. 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2017 दरम्यान, आरोपींनी संगनमत करीत ठेवीदारांनी गुंतवलेल्या रकमेतून 4 लाख 96 लाख 45 हजार 816 रुपयांची उचल केली. हा प्रकार त्यांनी कधीही समोर येऊ दिला नाही. जिल्हा विशेष लेखापरीक्षक विभागाने सोसायटीचे परीक्षण केले असता, गोंधळ पुढे आला. या प्रकरणी विशेष जिल्हा परीक्षक अनिल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी फसवणूक आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. आज आर्थिक गुन्हे शाखेने अध्यक्षासह चार संचालकांना अटक केली.
.....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com