तडीपारांसह चौघांना अटक

file photo
file photo

नागपूर : तहसील परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत लपून बसलेल्या आरोपींवर पोलिसांनी सापळा रचून छापा घातला. छाप्यात अंधारात दबा धरून बसलेल्या दोन तडीपार गुंडांसह चौघांना शस्त्रांसह अटक केली. अक्षय ऊर्फ गामा मनोज कांबळे (20, रा. भानखेडा), लखन ऊर्फ रोहन शैलेश धुरिया (22, रा. शांतीनगर), सलमान अब्दुल रहमान अंसारी (25, रा. यशोधरानगर) व मो. शाहरुख शेख रमजान (23, रा. यशोधरानगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास नमूद आरोपी गार्डलाइन येथील हजरतबाबा बगदी दर्ग्याच्या बाजूला मोकळ्या मैदानात बसले होते. ठाणेदार अजयकुमार मालवीय यांना माहिती समजताच पथकाला घटनास्थळी पाठवले. त्यावेळी इकबाल अहमद एहसान अहमद (25, रा. अंसारनगर) हा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी चौघांनाही पकडून तलवार, चाकू, रॉड, नायलॉन दोरी आणि बजाज पल्सर असा 60 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेले आरोपी कुख्यात गुंड असून, त्यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे अक्षय आणि लखन हे तडीपार गुंड असून शहरात फिरत होते. तहसीलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार मालवीय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com