चार महाविद्यालयांना स्वायत्तता! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील चार महाविद्यालयांना पुढील सत्रापर्यंत स्वायत्तता प्रदान होण्याची शक्‍यता आहे. यात इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, जी. एस. कॉलेज (नागपूर), शिवाजी विज्ञान आणि जे. बी. सायन्स वर्धा महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांचे अर्ज विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यानुसार यूजीसीची एक समिती महाविद्यालयांना लवकरच भेट देणार आहे. 

त्यानंतर महाविद्यालयांना स्वायत्तता प्राप्त होणार आहे. ही सर्व प्रक्रिया येणाऱ्या सत्रापूर्वी पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे एका वर्षापूर्वी देशातील नामवंत संस्थांना स्वायत्तता देण्याच्या दृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोगाला विद्यापीठांना निर्देश देण्याचे सांगण्यात आले. महाविद्यालयातील अभ्यासक्रमात अधिक लवचिकता राहावी, उद्योगांना तसेच अन्य क्षेत्रांत मागणी असलेले मनुष्यबळ महाविद्यालयात तयार व्हावे, गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडावे यामागील मुख्य उद्देश आहे. अनुदान आयोगानेसुद्धा महाविद्यालयांना स्वायत्तता प्रदान करण्यास पुढाकार घेण्याचे आदेश दिले. त्यासाठी ठरविलेल्या निकषात महाविद्यालयाने सातत्याने पाच वर्षे "अ' दर्जा मिळविणे आणि क्‍लासरूम, प्रयोगशाळा आणि इतर महत्त्वाच्या सोयीसुविधांची पूर्तता करणे आवश्‍यक करण्यात आले. विद्यापीठात नागपूर विद्यापीठातील यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी, रामदेवबाबा आणि रायसोनी अभियांत्रिकी या तीन संस्थांतील महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वीच बीसीयूडीचा पदभार आला असून विद्यापीठात चार महाविद्यालयांनी स्वायत्तेसाठी अर्ज केल्याची माहिती आहे. ते अर्ज अनुदान आयोगाकडे पाठविण्यात आल्याचे कळते. पुढल्या सत्रापासून महाविद्यालयांना स्वायत्तता मिळण्याची शक्‍यता आहे. 
डॉ. प्रमोद येवले,  प्र-कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ 

Web Title: Four colleges autonomy