गॅंगस्टर आंबेकरला चार दिवसांची पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

नागपूर - सट्टा किंग बाल्या गावंडे खून प्रकरणाचा मास्टरमाइंड गॅंगस्टर संतोष आंबेकरला मंगळवारी कळमना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पुन्हा चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

नागपूर - सट्टा किंग बाल्या गावंडे खून प्रकरणाचा मास्टरमाइंड गॅंगस्टर संतोष आंबेकरला मंगळवारी कळमना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पुन्हा चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

22 जानेवारी 2017 च्या रात्री कळमना ठाण्यांतर्गत योगेश कुंभारे आणि साथीदारांनी मिळून बाल्या गावंडेचा खून केला होता. दुसऱ्या दिवशी झुडपात मृतदेह आढळल्यानंतर ही घटना समोर आली. हत्याकांडाचा मास्टरमाइंड गॅंगस्टर संतोष आंबेकर असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात संतोषला आरोपी केले होते. संतोष हा आरोपींशी फोनवर संपर्कात होता. आंबेकरला भीती होती की बाल्या त्याचा गेम करणार, यामुळे त्याने योगेशला सुपारी देऊन त्याचाच गेम केला. या हत्याकांडात संतोषने तब्बल 16 महिन्यांपर्यंत पोलिसांना गुंगारा दिला. 2 डिसेंबर 2017 ला प्रकरणातील आठही आरोपींची न्यायालयाने आरोप सिद्ध न झाल्यामुळे सुटका केली होती. 

पाच दिवसांपूर्वी केले आत्मसमर्पण 
12 एप्रिलला आंबेकरने न्यायालयात आत्मसमर्पण केले. न्यायालयाने त्याची चार दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. या चार दिवसांत पोलिस त्याच्याकडून कोणतीही माहिती मिळवू शकले नाहीत. मंगळवारी एपीआय अरविंद पवार यांनी त्याला न्यायालयात हजर केले. तपासासाठी आणखी सात दिवसांची कोठडी मागण्यात आली. न्यायालयाने आंबेकरची 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली. न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात आंबेकर समर्थकांची उपस्थिती होती. 

Web Title: Four-day police custody for Gangster Ambekar

टॅग्स