नागपूर : अपघातात एकाच कुुटुंबातील चार जण ठार 

accident
accident

शेलूबाजार : सैलानी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या झायलो गाडीचा भीषण अपघात होऊन नागपूर येथील एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले. मन हेलावून टाकणारी ही घटना जवळच असलेल्या तऱ्हाळा गावाजवळ नागपूर-औरंगाबाद महामार्गावर आज (ता.20) पहाटे 4 वाजताच्या दरम्यान घडली. 

नागपूर येथील भाविक बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी येथे होळीनिमित्त दर्शनासाठी एम.एच.49 बी. 7019 या क्रमांकाच्या झायलो गाड़ीने जात होते. भरधाव वेगाने जात असलेल्या या गाडीच्या चालकाच्या डोळ्यावर समोरच्या वाहनाचे हेड लाइटचा प्रकाश पडल्याने चालक शेख इमरान यांचा गाड़ीवरील ताबा सुटला व गाडी रस्त्याच्या खाली गेली. हा अपघात एवढा भीषण झाला की,गाडी तीन वेळा पलटी झाली. अशी माहिती चालकाने दिली.

या अपघातात मुस्कान शेख सलीम (वय23), वहिदा शेख गुलाबनबी (वय 40), सलीम खान अब्दुल कासम (वय 50) रा. बडा ताज दर्गाह नागपूर यांचा जागीच मृत्यू झाला. तर यामध्ये अलिया शेख इम्रान (वय 6), शेख हरीश शेख इम्रान (वय 7), शेख नजिमा परवीन शेख इम्रान (वय 26), अलीबिरा शेख इमरान (वय 4) हे गंभीर जखमी झाले. तर यामध्ये उपचारादरम्यान एका जखमीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच इतर तीन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच तऱ्हाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल जागृत, मयूर ढेपे, शिवा खोटरे, गणेश बाईस्कार, लिंगले यांनी 108 क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका उपलब्ध केली. जखमींवर शेलूबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात व काहींना अकोला येथे उपचाराकरिता हलविण्यात आले. या झायलो गाडीमध्ये नागपूर येथील एकाच कुटुंबातील 11 जण असल्याची माहिती आहे. तर गाडीचालक शे. इम्रान हा किरकोळ जखमी झाला आहे.

अपघातातील जखमींना समाजसेवी नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना मदत करत अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढले व सदर घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिस कर्मचारी मेजर जवादे, पोलिस कॉन्स्टेबल मस्के हे घटनास्थळी दाखल झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com