file photo
file photo

फसवणूकप्रकरणी चार कर्मचाऱ्यांना अटक

यवतमाळ : श्रीराम सिटी फायनान्स लिमिटेड कंपनीत कर्मचारी म्हणून कार्यरत असताना एक कोटीच्या फसवणूकप्रकरणी अखेर चार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता.16) केली.
भूषण विजय भुसारी (वय 35, रा. महानंदानगर), रूपेश कमलकांत यादव (वय 34, रा. बोरेले ले-आउट), अमोल अरविंद पुरी (वय 42, रा. शिवाजी वॉर्ड, घाटंजी), हेमंत बोंद्रे (वय 34, रा. जामरोड) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. श्रीराम सिटी फायनान्स येथे चारही जण कर्मचारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी सोने तारण कर्ज संबंधाने एकूण 16 ग्राहकांच्या रोख रक्कम स्वीकारून त्यांना त्यांचे अस्सल सोन्याचे दागिने परत केले. मात्र, आलेली रक्कम कंपनीच्या खात्यात जमा केली नाही.
हा प्रकार लक्षात येऊ नये, म्हणून ग्राहकाने सोडविलेल्या दागिन्यांच्या पॉकेटचे दुसरे पाकीट तयार करून त्यात बनावट दागिने ठेवले. अपहाराची रक्कम एक कोटी 13 लाख 33 हजार 130 रुपये आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. आज अखेर कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com