40 जिल्हा मंचांकडे चार लाख तक्रारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

यवतमाळ : जागतिकीकरणाच्या युगात बाजारपेठ ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर विस्तारली आहे. थेट किंवा ऑनलाइन पद्घतीने वस्तूंची खरेदी करण्यात येत असल्याने प्रत्येक व्यक्ती ग्राहकाच्या भूमिकेत आहेत. राज्यातील 40 जिल्हा मंचांकडे स्थापनेपासून चार लाख एक हजार 760 तक्रारी आल्यात. त्यापैकी दोन लाख 64 हजार 423 तक्रारींचे निवारण करण्यात आले.

ग्राहक संकल्पना विस्तारत असताना ग्राहक हक्कांचे संरक्षण करणे गरजेचे बनले आहे. ग्राहक हक्काच्या संरक्षणात जिल्हा पातळीवर कार्यरत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. राज्यात ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग 1986 मध्ये स्थापन करण्यात आला. आयोगाचे मुख्यालय मुंबई येथे असून, औरंगाबाद व नागपूर या दोन ठिकाणी खंडपीठ आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मुख्यालयाच्या ठिकाणी तसेच तक्रारींचा ओघ विचारात घेऊन मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे आणि नागपूर येथे जिल्हा मंच स्थापन करण्यात आला आहे. राज्य आयोगाकडून वीस लाख ते एक कोटीपर्यंतच्या रकमेचे निवारण केले जाते. तर जिल्हा मंचाकडून वीस लाख ते त्यापेक्षा कमी रकमेच्या तक्रारीचे निवारण केले जाते. आयोगाच्या स्थापनेपासून मार्च 2019 पर्यंत जिल्हा मंचाकडे चार लाख एक हजार 760 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी दोन लाख 64 हजार 423 तक्रारींचे निवारण करण्यात आल्याची माहिती 2019 च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून पुढे आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four lacks complaints are pending to consumer forum