पावणेचार लाखांची दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर : "ड्राय डे'च्या दिवशी अवैध दारूविक्री करणाऱ्या 13 जणांवर गुन्हे दाखल करून पावणेचार लाखांचा माल उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला.

नागपूर : "ड्राय डे'च्या दिवशी अवैध दारूविक्री करणाऱ्या 13 जणांवर गुन्हे दाखल करून पावणेचार लाखांचा माल उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला.
सोमवारी बकरी ईदनिमित्त जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी कोरडा दिवस (ड्राय डे) जाहीर केला होता. त्या अनुषंगाने उपायुक्त उषा वर्मा व अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अवैध दारूनिर्मिती व विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. गणेश हिरास्वामी नायडू (रा. बायपास रोड, समाजभूषण सोसायटी, तवक्कल ले-आउट, वाडी) हा दारूविक्री करीत असल्याची माहिती विभागाला मिळाली. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड घालून 73 हजारांचा दारूसाठा जप्त केला. तसेच वाहनही जप्त केले. तसेच जिल्ह्यामध्ये 13 ठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले. यात 82 लिटर हातभट्टी, 27.58 लिटर देशी, 96 लिटर विदेशी दारू जप्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four lakhs worth of alcohol seized