चार अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

मंगरुळपीर - शहरालगत वाशीम रोडवर असलेल्या चमेली तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या अशोकनगर परिसरातील चार अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 9) दुपारच्या सुमारास घडली. अशोकनगर येथील रहिवासी रोशन भगत (वय नऊ), जीवक भगत (वय 10), रोहन अडाखे (वय 11 ) व आशुतोष बेलखेडे (वय 15) हे बुधवारी वाशीम रोडच्या बाजूला असलेल्या शेतशिवारातील चमेली तलावाकडे बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. या वेळी हे चौघेही तलावात पोहण्यासाठी उतरले. मात्र, तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहायला येत नसल्याने हे चौघेही बुडत असल्याचे एका मुलाला दिसून आले. त्यामुळे ही माहिती त्याने घरी येऊन सांगितली.

मंगरुळपीर - शहरालगत वाशीम रोडवर असलेल्या चमेली तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या अशोकनगर परिसरातील चार अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 9) दुपारच्या सुमारास घडली. अशोकनगर येथील रहिवासी रोशन भगत (वय नऊ), जीवक भगत (वय 10), रोहन अडाखे (वय 11 ) व आशुतोष बेलखेडे (वय 15) हे बुधवारी वाशीम रोडच्या बाजूला असलेल्या शेतशिवारातील चमेली तलावाकडे बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. या वेळी हे चौघेही तलावात पोहण्यासाठी उतरले. मात्र, तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहायला येत नसल्याने हे चौघेही बुडत असल्याचे एका मुलाला दिसून आले. त्यामुळे ही माहिती त्याने घरी येऊन सांगितली. त्यामुळे अशोकनगर भागातील नागरिक व महिलांनी चमेली तलावाकडे धाव घेतली. या मुलांचा तालावात शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा चारही मुलांचे मृतदेह आढळून आले.

Web Title: Four minor children died drowned in the lake

टॅग्स