सावधान! आणखी चार दिवस पावसाचा धडाका 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

हवेत अधिक आर्द्रता असल्याने आणि तापमानातील वेळोवेळी होत असलेल्या बदलामुळे पावसाचा जोर अजून काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. हवामान विभागाने 7 नोव्हेंबरपर्यंत वादळी तसेच जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविलेली आहे. 
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर 

अकोला : जूनपासून पावसाने हल्लकल्लोळ माजवला आहे, तो काही थांबता थांबेना. आणखी येत्या सात तारखेपर्यंत पावसाचा धडाका कायमच राहणार असल्याची चिन्हे आहेत. नदी-नाले तुडुंब भरल्यामुळे त्या काठच्या गावांना धोका होण्याची शक्‍यता आहे. बार्शीटाकळीमध्ये सर्वाधिक 666.30 मिमी पाऊस आजपर्यंत पडला आहे. 

No photo description available.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात मॉन्सूनच्या पावसाला जोरदार सुरुवात झाली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडल्याने खरिपातील सर्वच पिकांची स्थिती उत्तम झाली. मात्र, पावसाचा जोर त्यानंतरही कमी झाला नसल्याने अतिवृष्टी होऊन मूग, उडीद व सोयाबीन पिकही पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाले. वार्षिक सरासरीच्या 130 टक्के पाऊस पडल्याने जिल्ह्यातील शेती पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली असून, कपाशीचे पीक सुद्धा हातचे जाण्याची शक्‍यता आहे.

 

शिवाय सर्व जलप्रकल्प फुल्ल झाल्याने त्यामधून विसर्ग केला जात आहे. हे पाणीसुद्धा शेतामध्ये, नदीकाठच्या गावांमध्ये शिरून मोठी हाणी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. 

No photo description available.

अजून आठवडाभर झोडपणार 
जिल्ह्यासह विदर्भात सर्वत्र पावसाचा जोर कायम असून, आठवडाभर पाऊस झोडपणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. एवढेच नव्हे तर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्‍यता सुद्धा वर्तविण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. 

 

Image may contain: 1 person, standing and suit

हवेत अधिक आर्द्रता असल्याने आणि तापमानातील वेळोवेळी होत असलेल्या बदलामुळे पावसाचा जोर अजून काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. हवामान विभागाने 7 नोव्हेंबरपर्यंत वादळी तसेच जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविलेली आहे. 
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर 

 

दोन्ही हंगाम पाण्यात! 
मॉन्सूनचे महिनाभर आगमन, पेरणीनंतर महिनाभराच पावसाचा खंड आणि त्यानंतर संततधार पाऊस यामुळे अख्खा खरीप पावसात डुबला असून, सर्वच पिके उद्‌ध्वस्त झाली आहेत. पावसाचा कहर एवढ्यावरच थांबला नसून, अजूनही जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे. शेते पाण्याने तुडूंब भरली असून, अनेक ठिकाणी शेतशिवारात चिखलमय झाले आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी सुद्धा अजून महिनाभर करता येणे शक्‍य नसून, आठवडाभर पावसाचा जोर कायम राहल्यास दोन्ही हंगाम पाण्यात वाहून जाण्याची शक्‍यता आहे. 

 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 
भारतीय हवामान विभागाच्या संदेशानुसार ते नोव्हेंबर दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्‍यता वर्तविली आहे. बार्शीटाकळी तालुक्‍यातील काटेपूर्णा व दगडपारवा प्रकल्प टक्के भरला असून, दुपारी वाजता काटेपूर्णाचे गेट क्रमांक , , व असे चार गेट प्रत्येकी से.मी. उघडण्यात आले असून, त्यामधून . क्‍यु.मेक्‍स विसर्ग होत आहे. मूर्तिजापूर तालुक्‍यातील पूर्णा नदीवरील घुंगशी बॅरेज टक्के भरले असून, अतिरिक्त पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीमध्ये करण्यात येत आहे. पूर्णा नदीवरील नेर धामना बॅरेज जलसंचय पातळी वाढविण्याचे काम सुरू असून, पूर्णा नदीची पाणी पातळी वाढणार आहे. त्यामुळे नदी-नाला काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, क्षेत्रीय यंत्रणांनी मुख्यालयी उपस्थित राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. 

 

यामुळे लांबला पाऊस 
अरेबियन समुद्रात, आंध्रप्रदेश, ओडिसा, बंगालच्या उपसागरात नेहमीच वादळे येतात. यावर्षी मात्र तापमानातील आमुलाग्र बदलामुळे साऊथ इंडियाच्या भागात, प्रामुख्याने केरळजवळ सुरुवातीला "कायर' आणि पाच दिवसाच्या अंतरात "माहा' हे वादळ निर्माण झाले. त्यामुळे अजूनपर्यंत पावसाचा जोर कायम असून, अजून आठवडाभर पाऊस लांबण्याची शक्‍यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. 

शनिवारपर्यंतचे जिल्ह्यातील पर्जन्यमान 
तालुका     1 जून ते 2 नोव्हेंबरपर्यंतचा पाऊस   टक्‍केवारी 
अकोला      725.20 828.50                         114.25 
बार्शीटाकळी 666.30 1115.50                     167.41 
अकोट      679.40 923.50                         135.92 
तेल्हारा      672.00 906.50                        134.89 
बाळापूर      656.20 954.30                       145.42 
पातूर      739.10 931.90                           126.08 
मूर्तिजापूर      742.80 690.40                    92.94 
एकूण सरासरी      697.30 907.20               130.10 

 

जिल्ह्यातील जलप्रकल्पांची स्थिती 
प्रकल्प           जलाशय पातळी (मीटर)                  टक्‍केवारी 
काटेपूर्णा        347.77                                       100 
वान              412.00                                      100 
मोर्णा            366.97                                       100 
निर्गुणा         391.40                                       100 
दगडपारवा     317.00                                       100 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four more days of rain