मोहतांसह आणखी चार अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Mohtaji
Mohtaji

अकोला : सातव चौकातील बहुचर्चित मोहता यांच्या व्यापारी व निवासी संकुलासह शहरातील आणखी चार अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेने गुरुवारी कारवाई केली. त्यासोबत नियम धाब्यावर बसवून बांधकाम करण्यात आलेले वाणिज्य संकुल, शिकवणी वर्ग आणि निवासी बांधकामांची पाहणी आयुक्त संजय कापडणीस यांनी केली.


विशेष म्हणजे, शहरातील प्रतिष्ठांच्या इमारतींचाही अनधिकृत बांधकाम असलेल्या इमारतींमध्ये समावेश आहे. त्यापैकी सातव चौकातील इमारतीवर यापूर्वीही कारवाईचा बगडा उगारला होता. त्यावेळी कारवाई टळली असली तरी गुरुवारी मनपा आयुक्त कापडणीस यांनी जातीने उपस्थित राहून या इमारतीचे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली. याशिवाय अमानखाँ प्लॉटमध्ये तर मनपाकडून कोणताही नकाशा मंजूर न करून घेताच बांधकाम करण्यात आल्याचे आढळून आले.

रामनगरात तळघरासह दोन मजल्याची परवानगी घेवून थेट तिसरा मजलाही चढविण्यात आला असल्याचे आढळून आले. त्यामुळे या इमारती पाडण्यासोबतच त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात आली. मंगळवारपासून महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. पहिल्या दिवशी सहा इमारतींवर कारवाई करण्यात आली होती. बुधवारी ललीत ट्यूटोरियलची इमारत पाडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यांना अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत गुरुवारी संपली. शुक्रवारपासून महानगपालिका या इमारतीविरुद्ध कोणताही कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

1. रामनगर, श्‍याम मोहोरे
रामनगरातील श्‍याम माहोरे यांच्या अनधिकृत बांधकामावर मनपाने कारवाई केली. येथे मंजूर नकाशा प्रमाणे 250 चौरस मीटर बांधकाम आवश्‍यक होते. प्रत्‍यक्षात 300 चौ.मीटर म्हणजे मंजूर नकशापेक्षा 50 चौ. मीटर बांधकाम जास्त करण्यात आले. चारही बाजूच्‍या समास अंतरामध्‍ये जास्‍तीचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे मनपाकडून अनधिकृत बांधकामावर निष्‍कासनाची कारवाई करून श्‍याम माहोरे यांना 50 हजार रुपये दंड करण्यात आला.


2. रामनगर, डॉ. गितेश जाजू
रामनगर येथील दुसरी कारवाई डॉ.गितेश जाजू यांच्या अनधिकृत बांधकामावर करण्यात आली. येथे मंजूर नकाशा प्रमाणे तळमजला अधिक दोन मजले मिळून 270 चौरस मीटर होते. प्रत्‍यक्षात येथे तळ मजल्यासह तीन मजले असे एकूण 360 चौसर मीटर बांधकाम करण्यात आल्याचे आढळून आले. संपूर्ण तिसरा मजल्याचे 90 चौ.मीटर बांधकाम अनधिकृत आढळले. समास अंतरामध्‍ये पूर्व बाजूला 3 ऐवजी 2 रनिंग मीटर, पश्चिम बाजूला 3 मीटर समास अंतराऐवजी 3.20 रनिंग मीटर ऐवढे सोडलेले आढळून आले. उत्‍तरेकडे 4.50 मीटर ऐवजी 1 रनिंग मीटर तसेच दक्षिण बाजूला 1.50 मीटर ऐवजी 0.90 रनिंग मीटर एवढे अंतर सोडलेले आढळून आले. त्यामुळे अनधिकृत बांधकामावर निष्‍कासनाची कारवाई करून डॉ. गितेश जाजू यांना 1 लाख रुपयांचा दंड करण्यात आला.


3. अमानखॉँ प्लॉट, रमेश मोरे
अमानखाँ प्लॉट येथे रमेश मोरे यांनी मनपाची परवानगी न घेताच 600 चौरस फुटाचा बांधकाम केले. त्यामुळे त्‍यांचे अनाधिकृत बांधकामावर निष्‍कासनाची कारवाई करून रमेश मोरे यांनी 25 हजार रुपये दंड करण्यात आला.


4. सातव चौक, इंदूमती मोहता
सातव चौक येथील सौ. इंदुमती मोहता यांच्या बहुचर्चीत इमारतीवर बुधवारी मनपातर्फे कारवाई करण्यात आली. यापूर्वीही या इमारतीचा समावेश 186 अनधिकृत इमारतीमध्ये होता. त्यावेळी कारवाई टळली असली तरी बुधवारी मात्र या इमारतीवर मनपाचा हातोडा चालला. या इमारतीचा मंजूर नकाशा 1130.08 चौसर मीटर आहे. प्रत्‍याक्षात येथे 2816.88 चौ.मीटर एवढे बांधकाम केलेले आहे. येथे दुपटीपेक्षा अधिक म्हणजे 1686.80 चौरस मीटर जास्तीचे बांधकाम केलेले आहे. समास अंतरामध्‍ये पूर्व बाजूला 6.16 ऐवजी 3.3 रनिंग मीटर, पश्चिम बाजूला 6.16 मीटर समास अंतराऐवजी 3.3 रनिंग मीटर, उत्‍तर बाजूला 3.55 ऐवजी काहीही जागा सोडलेली नाही. दक्षिण बाजूला 4.50 ऐवजी 3.20 एवढी जागा सोडलेली आढळून आली. त्‍यांचे अनाधिकृत बांधकाम पाडण्‍याची कारवाई मनपा आयुक्‍त यांच्‍या आदेशान्‍वये व उपस्थितीत सुरू करण्यात आली. इंदूमती मोहता यांना 50 हजार रुपये दंड आकारण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com