विदर्भावरील कोरोनाचे संकट गडद, आणखी चार पॉझिटिव्ह रुग्णांची भर

corona positive
corona positive

अमरावती/नागपूर : कोरोनामुळे संपूर्ण जग दहशतीत असताना विदर्भात मंगळवारी पुन्हा चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. यात अमरावतीतील तिघांचा समावेश असून अकोल्यातील एक आहे. अकोल्यामध्ये पहिला रुग्ण असल्याने आतापर्यंत बिनधास्त असलेले प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ज्या परिसरात रुग्ण आढळला तो परिसर प्रशासनाने सील केला आहे.

अमरावतीतील हाथीपुरा परिसरातील निधन झालेल्या नागरिकाच्या संपर्कातील तीन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. निधन झालेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील 24 जणांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील कोविड रुग्णालयात ठेवण्यात आले होते.

अमरावतीत तीन तर अकोल्यात एक 
त्यापैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, त्यांना पॉझिटिव्ह रुग्णांसाठीच्या स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार होत आहेत. कोविड रुग्णालयात सोमवारी उपचारादरम्यान निधन झालेल्या नागरिकाचा अहवाल प्रलंबित आहे. तसेच अकोल्यामध्ये पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. ज्या परिसरात हा रुग्ण आढळला तो परिसरात अकोला प्रशासनाने सील केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com