सामूहिक अत्याचारप्रकरणी चौघांना चार दिवसांची कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

वणी (जि. यवतमाळ) : बालिकेच्या अज्ञानाचा फायदा घेत तिच्यावर सामूहिक अत्याचार करणाऱ्या चार युवकांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मैत्री असलेल्या वणी येथील करण काळे या युवकाने 14 वर्षीय बालिका वणी बसस्थानकावर उभी असताना तिला बळजबरीने दुचाकीवर बसून निर्जनस्थळी नेले. दुसरा मित्र मयूर क्षीरसागर याला तिथे बोलावले. या दोघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर दुसरे दोन मित्र शेख आवेश शेख सिद्दीक, गोलू मेश्राम यांनीही तिच्यावर अत्याचार केला. पीडित बालिकेला त्रास होत असल्याने ती मारेगाव येथील रुग्णालयात गेली आणि हे प्रकरण उघडकीस आले.

वणी (जि. यवतमाळ) : बालिकेच्या अज्ञानाचा फायदा घेत तिच्यावर सामूहिक अत्याचार करणाऱ्या चार युवकांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मैत्री असलेल्या वणी येथील करण काळे या युवकाने 14 वर्षीय बालिका वणी बसस्थानकावर उभी असताना तिला बळजबरीने दुचाकीवर बसून निर्जनस्थळी नेले. दुसरा मित्र मयूर क्षीरसागर याला तिथे बोलावले. या दोघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर दुसरे दोन मित्र शेख आवेश शेख सिद्दीक, गोलू मेश्राम यांनीही तिच्यावर अत्याचार केला. पीडित बालिकेला त्रास होत असल्याने ती मारेगाव येथील रुग्णालयात गेली आणि हे प्रकरण उघडकीस आले. चाइल्ड लाइनला माहिती देण्यात आल्याने या पथकाच्या मदतीने गुन्हा नोंदविण्यात आला. या चारही युवकांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four sent to police custody