बी.एससी, बी.कॉम.ला चार हजार जागा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

नागपूर : प्रवेश मिळत नसल्याने चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या नामांकित महाविद्यालयांच्या जागा वाढीच्या प्रस्वाताला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे बीएसस्सी व बीकॉमच्या सुमारे चार हजार जागा वाढणार आहेत.

नागपूर : प्रवेश मिळत नसल्याने चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या नामांकित महाविद्यालयांच्या जागा वाढीच्या प्रस्वाताला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे बीएसस्सी व बीकॉमच्या सुमारे चार हजार जागा वाढणार आहेत.
विद्यापीठाकडे आलेल्या प्रस्तावानुसार 92 महाविद्यालयांना 20 जागांची वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची प्रवेशाची चिंता मिटणार आहे. नियमित शिक्षक नसल्याचे कारण देत यावर्षी बऱ्यांच महाविद्यालयातील अभ्यासक्रमांवर प्रवेशबंदी घातली. यामध्ये ग्रामीण भागासह शहरातील शंभराहून अधिक महाविद्यालयांचा समावेश आहे. यामुळे पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशाला नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी बरीच मोठी वेटिंग लिस्ट असल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याचे चित्र होते. त्यातच गत काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचा बी.कॉम., बी.एससी. अभ्यासक्रमाकडे कल वाढला आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयातील जागा पहिल्याच यादीमध्ये फुल्ल झाल्या होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेश केव्हा मिळणार म्हणून चिंतेत होते. रोज महाविद्यालयांच्या चकारा मारत होते. ओळख सांगूनही प्रवेश मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. सर्वांना सबुरीचा सल्ला देण्यात आला होता. मात्र एक एक दिवस निघत चालल्याने विद्यार्थी व पालकही अस्वस्थ झाले होते.
अतिरिक्त शिक्षकांनाही दिलासा
महाविद्यालयांनी जागेवाढीचा प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर केला होता. त्याचा विद्यापीठाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला. सुमारे चार हजार जागा वाढीस परवानगी दिल्याने आता सर्वांनाच प्रवेश मिळणार आहे. तसेच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांनाही मोठा दिलासा यामुळे मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four thousand seats to BSc, B.Com