चार जहाल माओवादी शरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

गडचिरोली - डिसेंबर महिन्यात चार जहाल माओवादी गडचिरोली पोलिसांना शरण आले. यात एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. महिला माओवादीवर चार लाख तर इतरांवर प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बक्षीस आहे.

शरण आलेल्या माओवाद्यांमध्ये कान्हू ऊर्फ लालसाय महारसिंग मडावी (रा. डाबरी, ता. कोरची), सुनील ऊर्फ सन्नू गट्टी आतलामी (रा. मोरखंडी, ता. पाखांजूर, जि. कांकेर, छत्तीसगड), सरुणा ऊर्फ जोगी विज्या गावडे (रा. सिरकोंडा, ता. सिरोंचा), आकाश ऊर्फ विकास बाजू जांगधुर्वे (रा. मरकेगाव, ता. धानोरा) यांचा समावेश आहे.

कान्हू मडावी कोरची, दर्रेकसा दलममध्ये कार्यरत होता. बोंडे येथील चकमकीत त्याचा सहभाग होता. सुनील आतलामी याचा गुंडूरवाही, ताडबैली, गट्टा (जांभिया) येथील चकमकीत सहभाग होता. सुरणा गावडे हिचा मल्लमपडूर, मुंगनेर, नारगुंडा येथील चकमकी व रेगडी विश्रामगृहाच्या तोडफोडीत सहभाग होता. तिने कंपनी क्रमांक 4, प्लाटून क्रमांक 3 आणि 7 मध्ये कार्य केले. आकाश जांगधुर्वे चातगाव दलममध्ये सदस्य होता.

Web Title: Four ultra-Maoist to surrender