मोठ्या शिताफिनं पाकीट मारलं, अन मजूरीही नाही निघली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

मध्य़वर्ती बसस्थानकांवर  चार महिलांनी वृद्ध महिलेस लुटले, पाकीटात मात्र  निघाली कागदं  चोरट्या महिलांना समज देऊन पोलिसांनी दिले सोडून

अकोला : वृद्ध प्रवासी महिलेवर बससमध्ये पाळत ठेवली, प्रत्येक हालचाली टिपल्या, तिच्याकडील साहित्याची तिच्यापेक्षा यांनाच जास्त काळजी, अखेर अकोला आले, आता बस बसस्थानकात घुसली अन् प्रवासी उतरू लागले. ती प्रवासी वृद्ध महिलाही उतरली, अन् तेवढ्यातच चार चोरट्या महिलांनी तिचे पाकीट लंपास करून पोबारा केला. ऐवढ्या अथक परिश्रमानंतर चोरलेल्या पाकीटात निघाले रुपये ते साठ अन् काही कागदं. शेवटी पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या त्या चारही महिलांनी चोरलेले पाकीट परत केले अन् सुटका करून घेतली.

सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकावर संधीचा फायदा घेऊन प्रवाश्यांचे साहित्य चोरणाऱ्या चार महिलांना नागरिकांनी पकडून सिव्हिल लाईन्स पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र. पोलिसांनी या तिनही महिलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून दिल आहे. ही घटना शनिवारी (ता.7) सकाळी साडेअकरा वाजता दरम्यान घडलीजयमाला वसंतराव भारसाकळ (वय 66)ही वृद्ध त्यांच्या पतीसह पातूरवरून अकोला येत होती. मध्यवर्ती बसस्थानकात उतरताना त्या महिलेच्या साहित्यांवर नजर ठेवून असणाऱ्या चार चोरट्या महिलांनी त्यांच्या बँगेतून पाकीट काढून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी चोर-चोर म्हणून आरडाओरड सुरू होताच चोरट्या महिलांना नागरिकांनी पकडून सिव्हिल लाईन्स पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र. पोलिसांनी या तिनही महिलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. गत काही दिवसांपासून अकोला शहरासह मध्यवर्ती बसस्थानकावर महिलेच्या बॅगमधून चोरट्यांनी मद्देमाल लंपास केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीने वातावरण पसरले आहे. याकडे पोलिस विभागाने लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

No photo description available.
\

चोरट्या महिला केसाला फुगे विकणाऱ्या’
सिव्हिल लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्या महिलांची बोलीभाषा ही विशिष्ट प्रकारची होती.यावेळी पोलिसांनाही त्यांची चौकशी करताना अडथळे येत होते. यावेळी उपस्थितांनी त्या महिलांशी संवाद साधला असता त्या महिला केसाला फुगे विकून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती समोर आली.
 

महिलेने केले स्वतःच्या गळावर ब्लेडने वार !
शहरातील रामदासपेठ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देशमुख फैल परिसरात राहणाऱ्या एका महिलेने स्वतःच्या गळावर ब्लेडने वार केल्याची घटना शनिवारी (ता.7) घडली. त्यामुळे महिला किरकोळ जखमी झाली असून परिसरातील नागरिकांनी महिलेला उपचाराकरीता सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले आहे. जखमी महिलेवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती आहे. महिलेने स्वतः ब्लेडने वार का केले ? याचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी रामदासपेठ पोलिस स्टेशनला कुठल्याही स्वरूपाची तक्रार, फिर्याद दाखल करण्यात आलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four women rob an elderly woman