ट्रॅक्‍टर उलटून चार मजूर ठार; 13 जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

गोंदिया : धान रोवणीच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणारा भरधाव ट्रॅक्‍टर उलटल्याने चार मजूर ठार झाल्याची घटना गोंदिया-साकोली महामार्गावरील डव्वा येथे रविवारी (ता. 28) सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात 13 मजूर जखमी झाले असून, यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतीकामांना वेग आला आहे. त्यामुळे शेतात रोवणीसाठी मजुरांना ट्रॅक्‍टरद्वारे नेण्यात येत होते. सडक अर्जुनी तालुक्‍यातील डव्वा येथे धानरोवणीसाठी एक ट्रॅक्‍टर मजुरांना घेऊन जात होते. दरम्यान, डव्वा पुलावर ट्रॅक्‍टरचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्‍टर पुलावरून खाली कोसळले. यात चार मजूर जागीच ठार झाले; तर 13 जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर जखमी मजुरांना ट्रॅक्‍टरमधून बाहेर काढण्यात आले. काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four workers killed in tractor overturn; 13 injured