प्रेयसीचे चार वर्षे लैंगिक शोषण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

नागपूर : "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या प्रेयसीचे रियांश सुखराम राजपूत (23, रा. गजानननगर, नाका नं. 2) याने चार वर्षे शारीरिक शोषण केले. यानंतर लग्नास नकार दिला. युवतीच्या तक्रारीवरून प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियांश हा खासगी नोकरी करतो. नोकरी करीत असताना कोराडी येथे राहणारी 25 वर्षीय युवती शैलासोबत (बदललेले नाव) त्याची ओळखी झाली. शैलाने नर्सचे ट्रेनिंग केले असून, काही दिवस नोकरीसुद्धा केली. काही दिवसांनी दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. वारंवार भेटीगाठी झाल्यानंतर दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वयाने दोन वर्षांनी मोठी असलेल्या शैलाने रियांशला भाड्याने रूम घेऊन "लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहण्यासाठी ऑफर दिली. रियांशने तिला लग्नाचे आमिष दाखविले. चार वर्षे पती-पत्नीप्रमाणे सोबत राहिल्यानंतर रियांशने लग्नास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या शैलाने जरीपटका पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी रियांशविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four years of sexual abuse of a girlfriend