आयुक्तालयातील चौदा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

अमरावती : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याचे संकेत असतानाच पोलिस आयुक्तालयातील दोन सहायक पोलिस निरीक्षकांसह 12 उपनिरीक्षकांची आयुक्तालयातच अंतर्गत बदली करण्यात आली.

अमरावती : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याचे संकेत असतानाच पोलिस आयुक्तालयातील दोन सहायक पोलिस निरीक्षकांसह 12 उपनिरीक्षकांची आयुक्तालयातच अंतर्गत बदली करण्यात आली.
गाडगेनगर ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक दत्ताजी सुरेश देसाई व कविता सखाराम पाटील या दोघांची बदली अनुक्रमे नांदगावपेठ व बडनेरा ठाण्यात झाली. तर अमरावती जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले शहर कोतवाली ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र नामदेव गुलतकर व मनीषा गोपाळ सामटकर या दोघांचीही बदली शहर कोतवाली ठाण्यात करण्यात आली. त्या व्यतिरिक्त नागपुरीगेट येथील उपनिरीक्षक सुलभा प्रल्हाद राऊत बडनेरा, फ्रेजरपुराचे राजेंद्र सुखदेव लेवटकर वलगाव, अयुब हिराजी शेख नागपुरीगेट येथे जातील. बडनेरा येथील गणेश अहिरे व नांदगावपेठचे पंकज ढोके, या दोघांनाही गाडगेनगर ठाण्यात पाठविण्यात आले. राजापेठचे अनिल मुळे सीएमसी सेल, गाडगेनगरचे गोकुल ठाकूर बडनेरा, शहर कोतवालीच्या प्राजक्ता धावडे वलगाव, खोलापुरीगेटचे राम कदम नांदगावपेठ, राजापेठच्या शीतल निमजे नांदगावपेठ येथे बदलून गेल्या आहेत. दहा पोलिस उपनिरीक्षकांची बदली ही त्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourteen police officers transferred to the Commissionerate