खामगाव : एटीएम अपहार प्रकरणी एकास पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

एटीएम मधील रकमेचा अपहार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीची पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणात सहभागी अन्य साथीदार फरार आहेत. त्याच्या अटकेसाठी पथक पाठविण्यात आले आहे. त्यांनी अपहार केलेला पैसा कोठे आहे व अन्य माहिती तपासात समोर येईल
- संतोष टाले ठाणेदार शहर 

खामगाव : एटीएम मधील रकमेच्या अपहार प्रकरणी एकास १८ जुलै प्रर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

नागपूर व नांदेड येथील एटीएम फोडून लाखोंची रक्कम घेवून पसार होणार्‍या टोळीला खामगाव पोलिसांनी जेरबंद केल्याचे प्रकरण ताजे असतांना खामगावात मोठा एटीएम घोटाळा समोर आला आहे. एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी असणार्‍या एका सर्व्हीसेस असोसिएटने चौघांशी संगनमत करुन 49 लाखांची अफ़रातर  केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे तर इतर चार आरोपी फरार झाले आहेत. 

शेगाव, नांदुरा व खामगाव तालुक्यातील 8 एटीएममध्ये पैसे टाकणे तसेच सर्व्हिस देण्याची जबाबदारी लॉजी कॅश सोल्यूशन प्रा.ली. व एस.बी.पी. ट्रान्स ट्रॅझुअर सर्व्हिसेस, औरंगाबाद या कंपनीला देण्यात आलेली आहे . या कंपनीने या तीनही तालुक्यात एटीएम सर्व्हिसेस असोसिएट म्हणून मनोहर माणिकराव खेडकर रा. चिंतामणी नगर, खामगाव याला नियुक्त केले होते व त्याच्याकडे या तीनही तालुक्यातील 8 एटीएममध्ये पैसे टाकणे व दुरुस्तीची सर्व जबाबदारी दिली होती. दरम्यान मनोहर खेडकर याने स्वतःच्या फायद्यासाठी 28 मे ते 9 जुलै 2018 दरम्यान योगेश वामनराव हजारे, इद्रीस, जहीर व साजिद यांच्या मदतीने  एटीएममधील 49 लाख 18 हजार 600 रुपये काढून कंपनीचा विश्वासघात केला. याप्रकरणी लॉजी कॅश सोल्यूशन प्रा.ली. व एस.बी.पी. ट्रान्स ट्रॅझुअर सर्व्हिसेसचे शाखा व्यवस्थापक चेतन अशोक धुळे (30) रा. जवाहर कॉलनी, बौद्ध नगर औरंगाबाद यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसानी  मनोहर खेडकर, योगेश वामन हजारे, इद्रीस, इद्रीसचे वडील जहिर व इद्रीसचा मित्र साजिद या पाच जणांविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी मनोहर खेडकर यास अटक केली आहे. त्यास आज न्यायायालयात हजर केले असता १८ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोस्टेचे ठाणेदार संतोष ताले हे करीत आहेत.

एटीएम मधील रकमेचा अपहार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीची पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणात सहभागी अन्य साथीदार फरार आहेत. त्याच्या अटकेसाठी पथक पाठविण्यात आले आहे. त्यांनी अपहार केलेला पैसा कोठे आहे व अन्य माहिती तपासात समोर येईल
- संतोष टाले ठाणेदार शहर 

Web Title: fraud on atm in Khamgaon