बनावट सह्यांद्वारे महावितरणची नऊ लाखांची फसवणूक

बनावट सह्यांद्वारे महावितरणची नऊ लाखांची फसवणूक

नांदेड : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या तीन निविदेवर करून त्या खऱ्या आहेत, असे दाखवून महावितरणची नऊ लाखांची फसवणूक करून अपहार करणाऱ्या अभियंत्याला मुंबईतून बुधवारी (ता. नऊ) अटक करण्यात आली. हा आरोपी गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. शिवाजीनगर पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

येथील विद्युतभवन कार्यालयात कार्यकारी अभियंता (स्थापत्य) राजेंद्र आनंदराव देसाई रा. रत्नागिरी हा सन १३ फेब्रुवारी २०१४ ते ३० मे २०१५ या कालावधीत कार्यरत होता. कार्यकाळाच्या शेवटच्या एका महिन्यात त्यांनी महावितरणचे काम काढून निविदा प्रकाशित केल्या. त्यानुसार भरलेल्या निविदेवर वरिष्ठांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून २३ एप्रिल २०१५ रोजी चार लाख ९८ हजार ८७४ रुपयाचे काम ठेकेदार के. जी. नायर यांना दिले. त्यानंतर ता. १६ मे २०१५ रोजी मे. साक्षी कन्स्ट्रक्शनच्या नावे एक लाख ९९ हजार ९९० रुपये व एक लाख ९९ हजार ५० रुपयाचे काम पी. के. सिंग यांना दिले. संगनमत करून, विना अधिकार, खोट्या व बनावटी स्वाक्षऱ्या करून तब्बल आठ लाख ९७ हजार ९१५ रुपयांचा अपहार करून महावितरणची फसवणूक केली. 

या प्रकरणी विनय विट्ठल गायकवाड (महावितरण कर्मचारी) यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात २१ नोव्हेंबर २०१६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानी अटक पूर्व जामिनासाठी प्रयत्न केले. मात्र, जामिन मिळाला नव्हता. पोलिसांची नजर चुकवून तो मुंबई येथे महावितरणच्या प्रकाशगड, भांडूप, बांद्रा (पूर्व) येथे कार्यरत असल्याची माहिती शिवाजीनगर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम पठाण यांना मिळाली. 

पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्याशी चर्चा करून पटाण यांनी कर्मचारी शेख दुरानी यांना सोबत घेऊन मुंबई गाठली. तेथून देसाईला त्याच्या वरिष्ठाला व मुलाला सांगून ताब्यात घेतले. मुंबई झोन आठच्या निर्मलनगर ठाण्यात अटक करून नांदेडला आणले. येथील चौथे न्यायालयांनी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविले. या प्रकरणात ठेकेदारांचीही चौकशी करणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com