मायनं मोडला पदर, बापाने मोडली सोयरीक; तरीही लागली नाही नोकरी

fraoud.jpg
fraoud.jpg

अकोला : सरकारी नोकरी कुणाला नको, आयुष्यभराची कमाई गेली तरी चालेल मात्र, सरकारी नोकरी मिळून जर पोराचं आयुष्य सुख समाधानात जात असेल तर कबाडकष्ट करणारे मायबाप आयुष्यभराची कमाईसुद्धा दान करू शकतात. मात्र, अकोल्यात सध्या याउलट झाले आहे. कारण, मायनं पदर मोडून कमावलेले आणि बापाने चक्क पोरांची सोयरीक मोडून जमविलेले लाखो रुपये मुलाला नोकरी देणार म्हणून आरोपी प्रवीण सुरवाडेच्या घशात ओतले. पण झाले असे की, नोकरी तर मिळालीच नाही पण पैसाही गेला. अशा असंख्य गोष्टी सध्या आरोपी प्रवीण सुरवाडेच्या फसवणूक प्रकरणातून समोर येत आहेत.

बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी येथील अक्षय खंडारे या बेरोजगार युवकाने खदान पोलिस ठाण्यांत आरोपी प्रवीण सुरवाडे याने नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणानंतर खदान पोलिसांनी या टोळीतील एक-एक आरोपी ताब्यात घेणे सुरू केले आहेत. एकीकडे पोलिस पोलिसांचा तपास करीत आहेत. तर दुसरीकडे फसवणूक झालेले एक-एक प्रकरण दाखल होत आहे. 

यातच फसवणूक झालेल्या युवकांनी त्यांच्यासोबत घडलेली आपबिती अनेकांना थक्क करविणारी अशीच असून, काहींनी शेतातील तूर, सोयाबीन, कापूस विकून, तर काहींनी जवायाकडून उसणे घेतलेले पैसे आरोपी प्रवीण सुरवाडेच्या घशात ओतले आहेत. तर आळंदा येथील एका बेरोजगार युवकाची जमत असलेली सोयरीक आरोपी प्रवीण सुरवाडेने मोडून नोकरी मिळाली की, चांगल्या मुलीशी लग्न कर असे सांगून फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती ही फसवणूक झालेले युवक सांगतात. याप्रकरणात दररोज नवं-नवे किस्से समोर येत असून, फसवणूक झालेले युवक सध्या मेटाकुटीस आले आहेत.

महत्त्वाची बातमी - आता त...कापसाचाही बजेट हुकला!

बेरोजगार युवकांना गंडा घालणारे कारागृहात
समाजकल्याण विभागात नोकरी लावून देतो असे सांगून अकोल्यातील 15 युवकांसह राज्यभरातील 83 युवकांना प्रवीण सुरवाडेने गंडा घातला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात युवकांना 85 लाखांनी फसवणूक करणाऱ्या प्रवीण सुरवाडे आणि त्याचा साथीदार नीलेश खिल्लारे आणि बनावट कागदपत्रे बनविणारा रेहान खान या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, शनिवारी (ता.22) या तिन्ही आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे.

फसवणूक झालेल्यांनी तयार केला ‘सुरवाडे 420’ नावाचा ग्रुप
प्रवीण सुरवाडे याच्या टोळीने जिल्ह्यासह राज्यातील असंख्य जिल्ह्यातील बेरोजगार युवकांची फसवणूक केली आहे. सध्या या प्रकरणात दिवसागणिक एक-एक फसवणुकीचे प्रकरण समोर येत आहेत. फसवणूक झालेल्या युवकांनी ‘सुरवाडे 420’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला असून, या गृपमध्ये दररोज नव्या फसवणूक झालेल्या सदस्यांची जोडणी होत आहे.

फरार आरोपी लागेना गळाला
बेरोजगार युवकांना गंडा घालणाऱ्या टोळीतील प्रवीण सुरवाडे आणि त्याचा साथीदार नीलेश खिल्लारे आणि रेहान खान हे तिघे सध्या कारागृहात आहेत. असे जरी असले तरी संध्या प्रवीण सुरवाडे, निर्मला निकम आणि बळीराम गवई ते तीन आरोपी अद्यापही फरारच आहेत. या फरार आरोपींचा शोध खदान पोलिस घेत असून, लवकरच हे टोळके जेरबंद केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com