टिपेश्वर अभयारण्यात ऐटीत वाघांचा मुक्तसंचार

टिपेश्‍वर : शनिवारी अभयारण्यात मुक्त संचार करताना पर्यटकांनी टिपलेले छायाचित्र.
टिपेश्‍वर : शनिवारी अभयारण्यात मुक्त संचार करताना पर्यटकांनी टिपलेले छायाचित्र.

यवतमाळ : हमखास व्याघ्रदर्शन होणारे अभयारण्य म्हणून टिपेश्वरने अल्पावधीतच ख्याती प्राप्त केली आहे. त्यामुळे पर्यटक टिपेश्‍वर अभयारण्याकडे आकर्षित झाला आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात ऑनलाइन बुकिंग झाली. त्यामुळेच आता जून महिन्यापर्यंत अभयारण्य पर्यटकांसाठी खुले राहणार आहे.
टिपेश्‍वर अभयारण्य इतर अभयारण्यांच्या तुलनेत लहान असले तरी वाघांची संख्या वाढली आहे. परिणामी, पर्यटकांना हमखास व्याघ्रदर्शन होत आहे. क्षेत्रफळाने अभयारण्य लहान असून जवळपास 18 वाघांची संख्या या ठिकाणी आहे. उन्हाळी सुट्या तसेच हमखास व्याघ्रदर्शन याचा आनंद पर्यटक घेत आहेत. ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढल्याने टिपेश्वर अभयारण्यात वाघांचा ऐटीत मुक्तसंचार पर्यटकांना हमखास दिसत आहे. पर्यटकांना या अभयारण्यात सुन्ना व माथनी दोन गेटवरून प्रवेश करता येतो. सुन्ना येथून 11 तर माथनी गेटवरून 12 वाहने उपलब्ध आहेत. सकाळी 5.30 ते सात आणि दुपारी तीन ते 4.30 या कालावधीत वाहने सोडण्यात येत आहेत. जंगल भ्रमंती करताना अनेक पर्यटकांना एकाचवेळी पाच वाघ जंगलात ऐटीत फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे पर्यटक आपल्या मोबाईल, कॅमेरात या वाघांना कैद करीत आहेत.

वाघांची संख्या 18 वर
टिपेश्‍वर अभयारण्यातील वाघांची संख्या 18 वर गेली आहे. त्यामुळे पर्यटकांना हमखास व्याघ्रदर्शन होत आहे. सुट्टीच्या काळात ऑनलाइन बुकिंग वेटिंगवर राहत आहे. गेल्या काही काळात पर्यटकांची पसंती टिपेश्‍वरला मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com