किती बॉयफ्रेंड आहेत तुला, मित्राने केली विचारणा आणि...

गुरुवार, 11 जून 2020

चेतन व त्याचा मित्र अनिकेत असे दोघे युवतीची वाट बघत एमएच 02 डी 6679 क्रमांकाच्या वाहनात बसले होते. युवती त्याला भेटण्यास आली असता, तिला कारमध्ये बसवून दोघांनी तिचे अपहरण केले.

अमरावती : प्रेमप्रकरणात विश्वास महत्त्वाचा असतो. हेच प्रेम जर एकतर्फी असेल तर, त्यात विश्वास कमी अन्‌ शंकाच अधिक असतात. या प्रकरणात सुद्धा तसेच झाले. युवकाने ओळखीतील युवतीला बोलावून तिचे अपहरण केले. किती बॉयफ्रेंड आहेत? अशी विचारणा करून कारमध्येच मारहाण केली.

हेही वाचा - नागपुरात प्रीती दासचा धुमाकूळ, वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी

अमरावती ते नागपूर मार्गावर नांदगावपेठ टोल नाक्‍याजवळ ही घटना घडली. चेतन चरणदास गवई (वय 20, रा. नांदगावपेठ) याने एका 19 वर्षीय युवतीला फोन केला. आयफोन घेऊन जा, असा निरोप देऊन नांदगावपेठ थांब्याजवळ भेटण्यासाठी बोलावले. चेतन व त्याचा मित्र अनिकेत असे दोघे युवतीची वाट बघत एमएच 02 डी 6679 क्रमांकाच्या वाहनात बसले होते.
युवती त्याला भेटण्यास आली असता, तिला कारमध्ये बसवून दोघांनी तिचे अपहरण केले.

कार नांदगावपेठ टोलनाक्‍याजवळ देऊन निर्जनस्थळी थांबवली. युवती आपल्याला फसवीत असल्याचा संशय चेतनला आला. त्याने युवतीलाच किती बॉयफ्रेंड आहेत, अशी विचारणा करून शिवीगाळ केली व कारमध्ये असताना तिला जबर मारहाण केली. पीडितेने त्या दोघांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत नांदगावपेठ ठाणे गाठले.

अधिक माहितीसाठी - पप्पा गेल्यामुळे मला जीवनात रस राहिला नाही, मी पण जाते...

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चेतन गवईसह त्याचा साथीदार अनिकेत या दोघांविरुद्ध अपहरण, विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चेतन गवई यास अटक केली, घटनेच्या वेळी सोबत असलेला त्याचा साथीदार अनिकेत पसार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.