'भाजपसोबतची मैत्री तोडली '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

यवतमाळ - "राज्यात भाजपसोबत आमची मैत्री होती. मात्र, आता ही मैत्री तोडली आहे', अशी माहिती शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख विश्‍वनाथ नेरुरकर यांनी दिली. 

येथील विश्राम भवनात आज, सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मनोहर नाईक, माजी आमदार संदीप बाजोरीया आदी उपस्थित होते. 

महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून शिवसेना-भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. तेव्हापासून निर्माण झालेली कटुता अजूनही कायम आहे. राज्यातील वादाची किनार जिल्ह्यातही दिसून येत आहे. शिवसेनेकडे असलेले पालकमंत्रिपद काढून घेतल्याची "सल' अजूनही शिवसेनेला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या निवडणुकीत एकत्र येण्याचे टाळले. त्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीतही दोघांनी वेगळे राहणे पसंत केले आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपमधील वाद जिल्ह्यात चांगलाच विकोपाला गेला आहे. त्यात शिवसेनेचे उपनेते नेरुरकर यांनी आज केलेल्या विधानामुळे भर पडल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: Friendship with the BJP cut