संकल्पपूर्तीची ही दोस्ती तुटायची नाय

अतुल मांगे
रविवार, 5 ऑगस्ट 2018

"दुर्घटनासे देर भली' या उक्‍तीची प्रचिती आल्यानंतर नागपुरातील उद्योजक भगवानदास तेवानी यांनी वाढत्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याचा चंग मनाशी बांधला. हा विचार त्यांनी आपल्या मित्राला बोलून दाखविला. त्यानेही सकारात्मकता दर्शविल्यानंतर अपघात कमी करण्यासाठी लोकप्रबोधनासाठी दोघे एकत्र आले. चांगल्या कार्यासाठी एकत्र आल्याने दोनाचे चार होण्यास वेळ लागला नाही आणि "जनआक्रोश'चा जन्म झाला. अल्पावधीतच तेवानी यांचा मृत्यू झाला. परंतु त्यांनी लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आणि पाहता पाहता संस्थेशी 65 वर सदस्य जुळले.

"दुर्घटनासे देर भली' या उक्‍तीची प्रचिती आल्यानंतर नागपुरातील उद्योजक भगवानदास तेवानी यांनी वाढत्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याचा चंग मनाशी बांधला. हा विचार त्यांनी आपल्या मित्राला बोलून दाखविला. त्यानेही सकारात्मकता दर्शविल्यानंतर अपघात कमी करण्यासाठी लोकप्रबोधनासाठी दोघे एकत्र आले. चांगल्या कार्यासाठी एकत्र आल्याने दोनाचे चार होण्यास वेळ लागला नाही आणि "जनआक्रोश'चा जन्म झाला. अल्पावधीतच तेवानी यांचा मृत्यू झाला. परंतु त्यांनी लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आणि पाहता पाहता संस्थेशी 65 वर सदस्य जुळले. अपघातमुक्‍तीच्या संकल्पातून निर्माण झालेली ही दोस्ती मरेपर्यंत तुटायची नाय, अशी भावना संस्थेच्या प्रत्येक सदस्याची आहे.
रस्त्यावर होणाऱ्या अपघातांपैकी बरेच अपघात अतिघाई, दुर्लक्ष, आततायीपणामुळे होत असल्याचे जनआक्रोशने केलेल्या संशोधनातून पुढे आले. त्यामुळे वाहन चालविताना पाळावयाचे नियम, कायदे लोकांना पटवून देण्याचे सदस्यांनी ठरविले. निवृत्तीनंतर एका विशिष्ट संकल्पपूर्तीसाठी एकत्र आलेल्या या मित्रांनी शहरातील चौक, आरटीओ कार्यालय, शाळा-महाविद्यालये, गर्दीचे ठिकाण गाठून जनजागृती सुरू केली. वेगवेगळ्या क्षेत्रातून निवृत्त झालेले मित्र सकाळी फिरण्याच्या निमित्ताने एकत्र येत. तेथेच दररोजचे प्लानिंग व्हायचे. त्यानुसार ठरवून संध्याकाळी ज्या वेळी अपघाताची शक्‍यता अधिक असते अशा वेळी चौकाचौकात नागरिकांचे प्रबोधन सुरू केले. दिवसेंदिवस मैत्रीचा हा समूह वाढत गेला. सध्या जनआक्रोश नोंदणीकृत संस्था असून, ज्येष्ठ सदस्यांसह शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थीही संस्थेशी जुळत आहेत.
निवृत्तीनंतर एकाकीपण येते. त्यातून नैराश्‍य वाढीस लागते. सततच्या विचारांमुळे आजरा बळावतात आणि मनुष्य गलितग्रात होतो. परंतु आमचे तसे नाही. जनजागृतीच्या निमित्ताने आम्ही दररोज एकत्र येतो. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. गप्पाचे फड रंगतात. सायंकाळचे प्लानिंग होते. प्रत्येक दिवशीचे काही ना काही ठरले असते. जनजागृतीसोबतच लाखमोलाचे मित्र मिळाल्याने आयुष्य सार्थकी लागल्याचे समाधान जनआक्रोशचे पदाधिकारी व्यक्‍त करतात.
 

 

 

Web Title: friendship day news of janakrosh