फळविक्रेत्याचा चांदूररेल्वेत खून

file photo
file photo

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : जुना बसस्थानकावर असलेल्या फळविक्रेते मेश्राम व कावरे कुटुंबाचा व्यवसायाच्या चढाओढीने नेहमी वाद होत होता. या वादाचे पर्यवसान फळविक्रेत्या ऋषिकेश मेश्राम यांचा शुक्रवारी (ता. 30) रात्री नऊच्या सुमारास खून झाला. दरम्यान, शुक्रवारी रात्री 9 वाजता मंगेश कावरे (वय 32) याने ऋषिकेश(वय 22)वर चाकूने वार केले. या घटनेत ऋषिकेशचा जागीच मृत्यू झाला. तसेच ऋषिकेशचा भाऊ ललित मेश्राम याच्यावरही वार केल्याने तोही जखमी झाला. त्याला अमरावती येथे इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. तर प्रकाश कावरे यांच्या घरावर संतप्त जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात संशयित आरोपीचे वडील प्रकाश कावरे (वय 60) हे गंभीर जखमी झाले. ऐन पोळ्याच्या दिवशी घटना घडल्याने शहरात कर्फ्युसदृश वातावरण तयार झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com