पेट्राेलचे-डिझेलचे दर भडकले

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

दरराेज ठरणारे पेट्राेल, डिझेलचे दर हळूहळू वाढत सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत. गत आठवडाभरात दर आणखी भडकले असून, साेमवारी (ता.20) पेट्राेल 85.5 रुपये, तर डीझेल 72.35 रुपयांवर पाेहाेचले.

अकाेला- दरराेज ठरणारे पेट्राेल, डिझेलचे दर हळूहळू वाढत सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत. गत आठवडाभरात दर आणखी भडकले असून, साेमवारी (ता.20) पेट्राेल 85.5 रुपये, तर डीझेल 72.35 रुपयांवर पाेहाेचले.

पेट्राेल, डिझेलच्या दरात दरराेज वाढ हाेते. परंतु, ही वाढ दहा, वीस पैशांची असल्याने त्याचा फारसा परिणाम सर्वसामान्यांना जाणवत नाही. मात्र, 60 रुपये प्रती लिटर मिळणारे पेट्राेल चक्क 85.5 रूपये, तर स्पीड पेट्राेल 87.84 रूपयांवर येऊन ठेपले आहे. येत्या आठवड्यात पेट्राेलच्या दरात आणखी वृद्धी हाेणार असल्याचेही संकेत जाणकारांनी दिले आहेत. ‘स्लाे पाॅईझन’ प्रमाणे पेट्राेलच्या वाढणाऱ्या किंमती हळूहळू सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम करत आहे.

दुष्काळ करही कायम
पेट्राेलवर विविध प्रकारचे कर लादण्यात आले आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात दुष्काळ नसतानाही दुष्काळ कर लादण्यात आला आहे. पेट्राेलच्या मूळ किंमतीवर जवळपास 45 टक्के कर लादण्यात आल्याने त्याचे दर 85 रूपयांपर्यंत पाेहाेचले आहेत.

30 ते 40 पैशांनी दरवाढीची शक्यता
आठवडाभरापासून पेट्राेल, डिझेलचे दर वाढत आहेत. दरवाढीचे हे सत्र आणखी सुरू राहण्याची शक्यता अाहे. येत्या आठवडाभरात पेट्राेलच्या दरात आणखी 30 ते 40 पैशांनी वाढ हाेण्याची शक्यता आहे.

गत आठवड्यापासून पेट्राेल दरात वाढ हाेत आहे. यात काही प्रमाणात वाढ हाेणार असल्याची चर्चा असली,तरी दर कमी हाेण्याची शक्यता आहे.- राहूल रठी, अध्यक्ष, पेट्राेल पंप असाेसिएशन, अकाेला

Web Title: Fuel price increase agian