हुतात्मा जवान अग्रमन रहाटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेले तरोडा (ता.आर्णि) येथील पोलिस शिपाई अग्रमन बक्षी रहाटे यांच्यावर तरोडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

यवतमाळ : गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेले तरोडा (ता.आर्णि) येथील पोलिस शिपाई अग्रमन बक्षी रहाटे यांच्यावर तरोडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

गडचिरोली येथून त्यांचे पार्थिव उशीरा रात्री तरोडा येथे आणण्यात आले. सकाळी 10 वाजता येथील जिल्हा परिषद शाळेसमोर हुतात्मा अग्रमन रहाटे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. तत्पूर्वी पोलिस विभागाच्या वतीने त्यांना मानवंदना व हवेत बंदुकीच्या फैरी झाडून श्रध्दांजली वाहण्यात आली. 

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आामदार ख्वाजा बेग, आमदार राजू तोडसाम, अमरावती विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्रीकांत तरवाडे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे आदींनी शहीद रहाटे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून अंतिम दर्शन घेतले.

तत्पूर्वी हुतात्मा जवान अग्रमन रहाटे यांची अंतिम यात्रा मांगूळ व तरोडा गावातून नेण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिक अंतिम यात्रेत सहभागी झाले. यावेळी ‘शहीद अग्रमन रहाटे अमर रहे’ च्या घोषणा देण्यात आल्या.

Web Title: Funeral of martyr jawan Agraman Rahate