रोष! होमगार्ड धडकले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नागपूर : नवीन होमगार्ड नोंदणी प्रक्रिया रद्द केल्याने पात्र उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या उमेदवारांनी गुरुवारी पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला.

नागपूर : नवीन होमगार्ड नोंदणी प्रक्रिया रद्द केल्याने पात्र उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या उमेदवारांनी गुरुवारी पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला.
पात्र उमेदवारांनी युवा कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात गुरुवारी सकाळी अपर पोलिस अधीक्षक आणि होमगार्ड जिल्हा समादेशक मोनिका राऊत यांची भेट घेतली. आक्षेपांमुळे नोंदणी प्रक्रिया रद्द झाल्याचे सांगण्यात येत असल्याने आक्षेपांची पत्र दाखवा व ऑडिट रिपोर्ट दाखवा, अशी मागणी उमेदवारांनी केली. यावर फिजिकल टेस्ट सर्वांसमक्ष घेऊन उमेदवारांसमोरच निकाल घोषित केला. यामुळे अनियमिततेचा प्रश्‍नच नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.
30 वर्षीय उमेदवार पहिलेने सात दिवसांत तयारी कशी करायची असा प्रश्‍न उपस्थित केला. यावर राऊत यांनी डीजी होमर्गार्ड यांना भेटून व्यथा मांडण्याची सूचना केली. बंटी शेळके यांनी त्यांच्या म्हणण्यावर आक्षेप नोंदवित आपणच डीजी आणि पात्र उमेदवारांची भेट घडवून आणण्याची विनंती केली. या चर्चेनंतर मोनिका राऊत निघून गेल्या. यामुळे उमेदवार अधिकच चिडले. त्यांनी प्रवेशद्वारासमोर घोषणा सुरू केल्या. फेर भरती रद्द करा, नवीन भरती होणार नाही, मुख्यमंत्री लक्ष द्या, दुजाभाव चालणार नाही, आदी शोघणा देत परिसर दणाणून सोडला. मागण्या मान्य करण्यासाठी उमेदवारांनी प्रशासनाला दोन सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून, तीन सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणासह उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fury! Homeguard movement