Gadchiroli News : आपल्या चिमुकल्यांचा मृतदेह घेऊन १५ किमी चालले माय-बाप

तापाच्या उपचारासाठी डॉक्टरऐवजी पुजाऱ्याकडे गेलेल्या दोन चिमुकल्या भावंडांचा काही तासांच्या अंतराने अचानक संशयास्पद मृत्यू झाला.
Gadchiroli
Gadchirolisakal
Updated on

गडचिरोली - तापाच्या उपचारासाठी डॉक्टरऐवजी पुजाऱ्याकडे गेलेल्या दोन चिमुकल्या भावंडांचा काही तासांच्या अंतराने अचानक संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेनंतर जन्मदात्यांनी रुग्णालय गाठले, पण उशीर झाला होता. वेळेवर शववाहीका उपलब्ध नसल्याने मृतदेह खांद्यावर घेऊन या माय-बापाने १५ किलोमीटर अंतर पार करत घर गाठले. अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेची बुधवार (ता. ४ ) चित्राफित सार्वत्रिक होताच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com