Gadchiroli News : सर्वोत्कृष्ट संचलनाबद्दल गडचिरोली, गोंदिया सी-६० पथक प्रथम

२६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताकदिनी झालेल्या संचलनात भाग घेतलेल्या पथकांमधे सर्वोत्कृष्ट संचलनाबद्दल गडचिरोली, गोंदिया सी-६० पथकाने प्रथम क्रमांक पटकावला
gadchiroli gondia C-60 squad first best conduct on 26 January 2023
gadchiroli gondia C-60 squad first best conduct on 26 January 2023sakal
Summary

२६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताकदिनी झालेल्या संचलनात भाग घेतलेल्या पथकांमधे सर्वोत्कृष्ट संचलनाबद्दल गडचिरोली, गोंदिया सी-६० पथकाने प्रथम क्रमांक पटकावला

Summary

गडचिरोली : २६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताकदिनी झालेल्या संचलनात भाग घेतलेल्या पथकांमधे सर्वोत्कृष्ट संचलनाबद्दल गडचिरोली, गोंदिया सी-६० पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकां शासनातर्फे चषक देण्यात येतो. त्याकरिता गठित करण्यात आलेल्या निवड समीतीने उत्कृष्ट संचलनासाठी तीन पथकांची निवड बुधवार (ता. १९)केली.

यामध्ये गडचिरोली पोलिस दल व गोंदिया पोलिस दलाच्या सी-६० पथकाने संयुक्तरित्या गौरवास्पद कामगिरी करून २६ जानेवारी २०२३ रोजी मुंबई येथे झालेल्या संचलनामध्ये सर्वोत्कृष्ट संचलन करून प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून गडचिरोली पोलिस दलाचे अभिनंदन केले जात आहे.

प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये सर्वोत्कृष्ट संचलन करणाऱ्या पथकांना १ मे २०२३ महाराष्ट्रदिनाच्या ६३ व्या वर्धापन दिनी अपर पोलिस महासंचालकांच्या हस्ते चषकाचे वितरण करण्यात येणार आहे. त्याबाबतची रंगीत तालीम २९ एप्रिल २०२३ रोजी मुंबईतील दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे घेण्यात येणार आहे.

गडचिरोली पोलिस दलाचे सी-६० पथक नक्षलविरोधी कारवायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतातच, त्याचसोबत आपल्या शिस्तीचे आणि एकजुटीचे प्रदर्शन त्यांनी संचलनातून दाखवून दिले आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी संचलनात सहभागी सर्व अधिकारी व जवानांचे कौतुक केले असून भविष्यात अशीच कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com