गडचिरोलीत आज माओवाद्यांचा बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

रोमपल्लीचा डेपो जाळला; सिरोंचा-आलापल्ली मार्गावर झाडे फेकली; वाहतूक बंद

गडचिरोलीः जिल्ह्यात माअवोद्यांच्या कारवाया सुरूच आहेत. आज (सोमवार) माओवाद्यांनी भारत बंदची हाक देऊन रोमपल्लीचा वनविभागाचा लाकडाचा डेपो जाळला. झाडे तोडून रस्त्यावर फेकली; पत्रकेही भिरकावली. त्यामुळे सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. सिरोंचावरून गडचिरोली, नागपूरकडे जाणाऱ्या बसगाड्या बसस्थानकातच उभ्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून माओवांद्यांच्या कारवाया सुरू आहेत. कधी निवडणुकीला विरोध, तर कधी नागरिकांना मतदान करू नये, अशी आवाहनाची पत्रके त्यांनी दुर्गम भागातील गावांमध्ये टाकली होती. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून माओवाद्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. काल रात्रीच्या सुमारास माओवाद्यांनी रोमपल्लीचा वनविभागाचा डेपो जाळला. रस्त्यावर पत्रके फेकून सोमवारी बंदचे आवाहन केले. अन्याय, अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या आदिवासींना नक्षली करार देण्यात येते. दलितांना देशद्रोही, तर मुस्लिमांना दहशतवादी करार देण्यात येते, असे माओवाद्यांनी फेकलेल्या पत्रकात नमूद केले आहे. आदिवासी भागातील नैसर्गिक संपतीची लूट थांबविण्यात यावी, आदिवासींना जल, जंगल, जमिनीचे संपूर्ण अधिकार देण्यात यावे, असेही माओवाद्यांनी टाकलेल्या पत्रकात म्हटले आहे. पत्रकाच्या खाली भाकपा (माओवादी) गडचिरोली असे नमूद आहे.

Web Title: Gadchiroli Maoist bandh today