कोटमीवासींनी बॅनर जाळून केला नक्षल सप्ताहाचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा एटापल्ली तालुक्‍यातील कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोटमी गावातील नागरिकांनी नक्षलवाद्यांचे बॅनर व पत्रके जाळून नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहाचा शुक्रवारी (ता. 7) निषेध केला.

नक्षल्यांनी कोटमी परिसरात पीएलजीए सप्ताहात बंद पाळण्याचे आवाहन करणारे बॅनर रस्त्यावर लावले होते. तसेच पत्रके टाकली होती. कोटमीच्या ग्रामस्थांनी एकत्र येत नक्षल्यांचे बॅनर व पत्रकांची होळी केली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने कोटमी गावात रात्री मेणबत्तीसह नक्षलविरोधी शांतता रॅली काढण्यात आली. पोलिसांच्या सहकार्याने अनेक ठिकाणी ग्रामस्थ नक्षलवाद्यांचा विरोध करताना दिसत आहेत.

Web Title: gadchiroli naxal news

टॅग्स