तेंदूकंत्राटदारांकडून आणखी 1 कोटी 1 लाख जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

माओवाद्यांना पोहोचविली जात होती रक्कम; आल्लापल्ली पोलिसांनी केली कारवाई

गडचिरोली: माओवाद्यांना 75 लाख रुपये नेऊन देण्याच्या तयारीत असताना सोमवारी (ता. 22) मध्यरात्री पोलिसांनी आलापल्ली येथून अटक केलेल्या तीन तेंदू कंत्राटदारांकडून काल रात्री उशिरा पुन्हा 1 कोटी 1 लाख जप्त केले आहेत.

22 मेच्या मध्यरात्री अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील विशेष अभियान पथकाचे पोलिस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांनी आलापल्ली येथून पहाडिया तुळशीराम तांपला (वय 35), रवी मलय्या तनकम (वय 45), नागराज समय्या पुट्टा (वय 37) या चार तेंदू कंत्राटदारांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडील चारचाकी वाहनातून नक्षल पत्रक व 75 लाख रुपये रोख पोलिसांनी जप्त केले. न्यायालयाने तिघांची पोलिस कोठडीत रवानगी केल्यानंतर अधिक चौकशीदरम्यान तिघांकडून आणखी 1 कोटी 1 लाख जप्त करण्यात आले. ही रक्कम बोटलाचेरू येथे लपवून ठेवण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत या तिघांकडून 1 कोटी 76 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Web Title: gadchiroli news: 1 crore 1 lakh seized from the tendu contractor