जनताच बेभान सत्ताधाऱ्यांना नियंत्रित करेल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

गडचिरोली : सध्याचे सत्ताधारी बेभान झाले असून जनताच त्यांना नियंत्रित करतील, असे प्रतिपादन भारिप-बहुजन महासंघाचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी केले.
गडचिरोली येथील कात्रटवार भवन येथे रविवारी (ता.12) वंचित आघाडीच्या वतीने आयोजित संवाद यात्रेत ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून "उपरा'कार लक्ष्मण माने, माजी आमदार हरिदास भदे, ऍड. विजय मोरे, रोहिदास राऊत, माला भजगवळी, प्रा. प्रकाश दुधे, श्री. मगरे उपस्थित होते.

ऍड. आंबेडकर पुढे म्हणाले, गेल्या 70 वर्षात वंचितांना कुणीच स्वीकारलं नाही. त्यांना पाहिजे तसं शिक्षण मिळालं असतं, तर त्यांनी आरक्षण मागितलं नसतं. ही व्यवस्थाच ओरबडणारी व्यवस्था आहे. येथे कोण रक्तबंबाळ होईल हे सांगता येत नाही. केंद्रातील सरकार हे अतिविद्वान लोकांचं सरकार आहे. त्यामुळेच गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय देण्यात येत नाही, अशी टीका त्यांनी केली.
समाज जागृत होत आहे. त्यामुळे सत्ता भोगणाऱ्या नेत्यांना वाळीत टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे आंबेडकर म्हणाले.
नरेंद्र मोदी हे बेभान झाले आहेत. ते आकडे फुगवून सांगतात. जीएसटीमुळे शासनाच्या तिजोरीत किती पैसा आला, याचे उत्तर मोदींकडे नाही. पेटीएम व विजाकार्डच्या माध्यमातून भारतीयांचा पैसा विदेशी कंपन्यांच्या घशात घालण्यात येत असल्याची टीकाही त्यांनी केली. पंतप्रधान आपली शैक्षणिक कागदपत्रे दाखवायला तयार नाहीत. खोटं बोलण्याची प्रवृत्ती देशाच्या सर्वोच्च माणसात नसावी. देशाचा कुटुंबप्रमुखच खोटं बोलत असेल, तर इतरांचे काय, असा सवाल ऍड. आंबेडकरांनी केला.

Web Title: gadchiroli news