कारसह पुरात वाहून गेलेले दोन युवक बचावले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

गडचिरोली : सोमवारी (ता. 20) बस पुरात वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आज मंगळवारी पहाटे दोन युवक कारसह पुरात वाहून गेले. मात्र, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांनी या युवकांची सुखरूप सुटका केली. ही घटना गडचिरोलीजवळील गुरवळा गावाजवळ घडली.

गडचिरोली येथील निखिल सत्यनारायण चेरकरी (वय 27) व देवदत्त शरद धारणे (वय 26) आज भल्या पहाटे कारने गुरवळा गावाकडे जात होते. मात्र, गावाच्या आधी असलेल्या नाल्याला पूर आला होता. त्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करताच कार वाहून जाऊ लागली. प्रसंगावधान राखून दोघेही कसेबसे कारच्या बाहेर पडले. एक जण कारच्या छतावर चढला, तर दुसरा झाडावर. सकाळी घटनेची माहिती मिळताच तहसीलदार भोयर, नायब तहसीलदार किरमे, दुरणकर, मडावी तसेच सहायक पोलिस निरीक्षक उदार, पोलिस उपनिरीक्षक सिसाळ, सहायक फौजदार सहारे, गौरकर, तिम्मलवार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्यूब व दोराच्या मदतीने दोन्ही युवकांना सुखरूप बाहेर काढले.
वाहून गेलेली बस काढली
सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील नंदीगावजवळच्या नाल्यात सोमवारी (ता. 20) पुरात वाहून गेलेली राज्य परिवहन विभागाची बस प्रशासनाने आज दिवसभर प्रयत्न करून बाहेर काढली. 25 प्रवाशांसह ही बस वाहून गेली होती. मात्र, बस झाडाला अडल्याने तसेच गामस्थ वेळीच मदतीला धावल्याने मोठी दुर्घटना टळली होती.

Web Title: gadchiroli news