नातवाच्या मृत्यूच्या बातमीने आजीने घेतला जगाचा निरोप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

गडचिरोली : एकुलत्या एक नातवाचा मृत्यू झाल्याची बातमी सहन न झाल्याने आजीनेही जगाचा निरोप घेतल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली येथील इंदिरानगर येथे गुरुवारी (ता. 18) रात्री घडली. शोकाकूल वातावरणात शुक्रवारी (ता. 19) आजी व नातवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उमेश कृष्णा पोवरकार (वय 35, रा. इंदिरानगर), गौरा नकटू गोरडवार (75, रा. बोदली), अशी मृतांची नाव आहेत. उमेश याचे वडील व लहान भावाचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. वडील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. त्यामुळे उमेश तीन महिन्यांपूर्वीच अनुकंपावर नोकरीवर लागला होता. दरम्यान, गुरुवारी अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अंत्यसंकारासाठी नातेवाईक जमा झाले. उमेशच्या आईची आई गौरा गोरडवार याही अंत्यसंस्कारासाठी पोहोचल्या. मात्र, नातवाला मृतावस्थेत बघून त्यांचाही हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोघांच्या मृत्यू एकाच दिवशी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी सकाळी उमेशवर इंदिरानगर येथे; तर दुपारी बोदली येथील स्मशानभूमीत गौरा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उमेशच्या मागे तीन महिन्यांची मुलगी व पत्नी आहे.

Web Title: gadchiroli news