ब्रिटिश कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांची ग्लासफोर्ड गावाला भेट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

सिरोंचा : ब्रिटिश कालीन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांनी अचानक सिरोंचा तालुक्‍यातील ग्लासफोर्ड गावाला भेट देऊन तेथील लोकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामाचा पाढा व लोकांनी केलेल्या सहकार्याची आठवून करून दिली.

सिरोंचा : ब्रिटिश कालीन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांनी अचानक सिरोंचा तालुक्‍यातील ग्लासफोर्ड गावाला भेट देऊन तेथील लोकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामाचा पाढा व लोकांनी केलेल्या सहकार्याची आठवून करून दिली.
बस्तर क्षेत्राचे ब्रिटिश कालीन तत्कालीन जिल्हाधिकारी ग्लासफोर्ड यांच्या तीन पणतूंनी ग्लासफोर्डपेठा व सिरोंचा गावाला बुधवारी (ता.28)भेट दिली. त्याकाळात ग्लासफोर्ड यांनी या भागात बरेच वर्षे सेवा दिली होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सिरोंचा व बस्तर क्षेत्राचे जिल्हाधिकारी म्हणून 1852 ते 1862 या काळात चार्ज हेल्मेट रॉबर्टसन ग्लासफोर्ड यांचे पणतू फिटर ग्लासफोर्ड वय 87, सुजन ग्लासफोर्ड वय 83, जेनिफर हनमोल्ड व्हय 77 हे ऑस्ट्रेलिया वरून बामणी जवळील ग्लासफोर्डपेठा या गावात पोचले त्यांना अचानक बघून ग्रामस्थ अवाक झाले. त्यांनी गावातील नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या पणजोबाचे नावाने सदर गाव वसलेला आहे. तद्‌नंतर त्यांनी सिरोंचा येथील सार्वजनिक बांधकाम विश्राम गृहाला भेट देऊन विश्रामगृहाची पाहणी केली. सदर विश्रामगृह इंग्रज काळात बांधण्यात आले होते. त्यांनी विश्रामगृहातील वास्तव्याचा उजाळा देत कर्मचाऱ्यांशी चर्चा केली लोकांकडून इंग्रज राजवटीनंतर या भागाचा काय बदल हे जाणून घेतले.
ग्लासफोर्ड यांच्या नातेवाईकांशी सिरोंचा येथील रवी सल्लमवार, नागपूर येथून त्यांच्यासोबत आलेले गाइड हिमांशू, ग्लासफर्डपेठ येथील देवाजी मेडि, माजी उपसरपंच वेंकटस्वामी कारासपल्ली आदींनी संवाद साधला व इंग्रज राजवटीतील अनुभव त्यांच्याकडून जाणून घेतले. चार्ज हेल्मेट रॉबर्टसन ग्लासफोर्ड हे आपल्या वयाच्या 18 व्या साली सिरोंचात आल्याचे त्यांनी सांगितले.
ग्लासफोर्ड यांनी स्वतः वीस पानाची डायरी लिहिले असून त्या सिरोंचा भागात केलेल्या कामाचा उल्लेख आहे. एका पुस्तकात त्यांनी ग्लासफोर्डपेठ ,सिरोंचा व बस्तर बाबत माहिती लिहून ठेवले असून त्या माहिती आधारे ग्लासफोर्ड चे तीन पणतू यांनी ऑस्ट्रेलिया वरून सिरों गाठले असे त्यांनी त्यांनी गाईडला सांगितले.
इंग्रजांच्या आठवणी
सिरोंचा भागात इंग्रजांचे वास्तव्य होते. त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी विश्रामगृह तसेच सरकारी कामकाजासाठी इमारती बांधल्या. काही गावांना इंग्रज अधिकाऱ्यांचे नाव सुध्दा देण्यात आले. त्यातीलच ग्लासफोर्डपेठ हे गाव आजही चर्चेत आहे. मात्र या गावाचा अद्याप पाहिजे तसा विकास झाला नाही. इंग्रज राजवटीनंतर विकास कामाकडे
राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

Web Title: gadchiroli news