कमलापूरच्या "राणी'ला झाले पिल्लू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

गडचिरोली : सिरोंचा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये राणी नावाच्या हत्तीणीने आज, मंगळवारी पिल्लाला जन्म दिला. या कॅम्पमध्ये आठ हत्ती होते. यात मंगला, अजित, बसंती, प्रियंका, गणेश, राणी, आदित्य व रूपा यांचा समावेश होता. अजित व राणी यांच्यापासून नवीन पिलाचा जन्म झाला. तिचे नाव "सई' ठेवण्यात आले आहे. कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये नवीन पिलाच्या आगमनामुळे परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे. निसर्ग पर्यटन विकासाच्या दृष्टीने कमलापूर हत्ती कॅम्पचा विकास केला जाणार असल्याचे सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: gadchiroli news