अनाथ आदिवासी युवतीचा विनयभंग; आरोपीला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

सदर पीड़ित युवती (ता24) मंगलवार रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान जंगल परिसराकड़े एकटीच शौचास जात असल्याची संधी साधुन आरोपी जगन्नाथ याने तिचा पाठलाग केला ही बाब पिडितेच्या लक्षात आल्याने ती घराच्या दिशेने परत यायला लागली मात्र आरोपिने तिला रास्त्यात गाठून तीचे केस पकडून खालीपाडून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला

एटापल्ली - तालुक्यातील पंदेवाही येथील अनाथ आदिवासी 21 वर्षीय युवती जंगलाच्या दिशेने शौचास जात असल्याचे पाहून तीचे घराशेजारील हॉटेल चालक जगन्नाथ शिवकुमार बैरागी वय 30 वर्ष रा एटापल्ली या विवाहित नराधमाने विनयभंग केल्या प्रकरणी पीड़ित युवतीच्या तक्रारीवरुन विनयभंग, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंद कायदा व इतर कलमानुसार गुन्हा नोंद करुण आरोपीला अटक करण्यात आली आहे       

सदर पीड़ित युवती (ता24) मंगलवार रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान जंगल परिसराकड़े एकटीच शौचास जात असल्याची संधी साधुन आरोपी जगन्नाथ याने तिचा पाठलाग केला ही बाब पिडितेच्या लक्षात आल्याने ती घराच्या दिशेने परत यायला लागली मात्र आरोपिने तिला रास्त्यात गाठून तीचे केस पकडून खालीपाडून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तिने मात्र प्रसंगवधान साधुन त्याचे तावडीतून सुटुन घरी पडून येवून आपबीती नातेवाहिकांना सांगितली झटापटीट युवतीचे कपडे फाटले व चेह-यावर ओरबळे पडले असुन तिने केलेल्या धाडसाने तीला त्या नराधमाच्या तावडीतून सुटका करता आली, युवतीचे आई वडील तिच्या बालपनीच मरण पावले असुन ती मोठया भावाकड़े राहते अनाथ असल्याने तिला शिक्षण घेता आले नाही अशाच कमजोरीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने आरोपीचे तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलल्या जात आहे
एटापल्ली पोलिसांनी पीड़ित युवतीच्या तक्रारीवरुन  (ता24) रोजी गुन्हा नोंद करुण आरोपीला अटक करण्यात आहे आहे पुढिल तपास पोलिस निरक्षक विठ्ठल आचेवार यांचे मार्गदर्शनात् पोलिस करीत आहेत.

Web Title: gadchiroli news: arrest police