गडचिरोली: सुरजागड पहाडी परिसरात शक्तिशाली स्फोटके निकामी

मनोहर बोरकर
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पोलिस पथकाकडून सदर भुसुरुंग बॅटरीव्दारे ब्लास्ट करण्यात आले. त्यात कोणत्याही जीवहानी झालेली नसून एकाच दिवशी नक्षली स्फोट, पुरुण ठेवलेली स्फोटके मिळणे व चकमक होणे यातून माओवादी सक्रीय असल्याची जोरदार चर्चा व भिती तालुक्यात आहे.

एटापल्ली (जि. गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यातील प्रसिद्ध लोहखनिज पहाडी परिसरातील हेडरी पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर शक्तिशाली 40 किलो ग्रॅम वजनाची स्फोटके निकामी करण्यात पोलिसांना यश आले.

सोमवार (ता 18) रोजी गट्टा पोलिस स्टेशन हद्दीत सकाळी 9 वाजता दरम्यान क्लेमोर माईन्स बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर हेडरी ते परसलगोंदी मुख्य रस्त्यावर सोमवारी नक्षलवाद्यांनी भुसुरंग पेरून ठेवले असल्याच्या गोपनीय माहिती मिळाली होती. घटनास्थळापर्यंत रोड ओपनिंग करून बीडीडीएसच्या सहाय्याने भुसुरुंग असल्याचे खात्री झाल्याने खोदून काढण्याचा बेत पोलिसांनी आखला होता. परंतु अंदाजे 35/40 किलो स्फोटके जमिनीत खोलवर पुरुण असल्याने ते काढण्यास अडचण येत होती.

त्यामुळे पोलिस पथकाकडून सदर भुसुरुंग बॅटरीव्दारे ब्लास्ट करण्यात आले. त्यात कोणत्याही जीवहानी झालेली नसून एकाच दिवशी नक्षली स्फोट, पुरुण ठेवलेली स्फोटके मिळणे व चकमक होणे यातून माओवादी सक्रीय असल्याची जोरदार चर्चा व भिती तालुक्यात आहे.

Web Title: Gadchiroli news landmine blast in Gadchiroli