गडचिरोलीत बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

मनोहर बोरकर
शुक्रवार, 16 जून 2017

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : एटापल्ली येथील सार्वजानिक बांधकाम विभागात कार्यरत वरिष्ठ लिपिक किशोर पुरुषोत्तम रेगुलवार (वय 58) हे त्यांच्या निवासस्थानी (ता 16) शुक्रवारला मृतावस्थेत आढळून आले.

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : एटापल्ली येथील सार्वजानिक बांधकाम विभागात कार्यरत वरिष्ठ लिपिक किशोर पुरुषोत्तम रेगुलवार (वय 58) हे त्यांच्या निवासस्थानी (ता 16) शुक्रवारला मृतावस्थेत आढळून आले.

रेगुलवार यांना दारुचे व्यसन होते. ते कर्त्तव्याच्या ठिकाणी एकटेच राहत होते. बुधवारी रात्रीनंतर रेगुलवार घरातून बाहेर पडले नाहीत. आज (शुक्रवार) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास काही कार्यालयीन सहकारी त्यांना भेटण्यास त्यांच्या निवासस्थानी गेले असता त्यांच्या घरांचे दार आतून बंद असल्याचे दिसले. त्यांनी आवाज दिल्यानंतरही घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सहकाऱ्यांनी पोलिसात माहिती दिली. दुपारी तीन वाजता रेगुलवार यांच्या कुटुंबासमक्ष पोलिसांनी निवासस्थानाचा दरवाजा तोडून पाहणी केली. त्यावेळी रेगुलवार मृतावस्थेत आढळून आले. अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास एटापल्ली पोलिस करीत आहेत.

Web Title: gadchiroli news maharashtra news death of employee