एटापल्ली तालुक्यात पोलिस व नक्षल्यांकडून पोस्टर युद्ध जोरात

मनोहर बोरकर
शुक्रवार, 28 जुलै 2017

एकाच ठिकाणी परस्पर विरोधी बॅनर लावून निषेध

एटापल्ली (गडचिरोली): एटापल्ली तालुक्यातील कसनसुर मार्गावर चंद्रखंडी देवस्थान मंदिर जवळ पोलिस विभाग व माओवादी संघटनाकडून परस्पर विरोधी बॅनर लावून एकमेकांच्या कार्याचा निषेध नोंदवत जनतेला आव्हान करत आहेत. नक्षल्यांनी पोस्टर बॅनर लावून 28 जुलै ते 3 ऑगष्ट दरम्यान शहीद सप्ताह साजरा करण्याचे जनतेला आव्हान केले आहे.

एकाच ठिकाणी परस्पर विरोधी बॅनर लावून निषेध

एटापल्ली (गडचिरोली): एटापल्ली तालुक्यातील कसनसुर मार्गावर चंद्रखंडी देवस्थान मंदिर जवळ पोलिस विभाग व माओवादी संघटनाकडून परस्पर विरोधी बॅनर लावून एकमेकांच्या कार्याचा निषेध नोंदवत जनतेला आव्हान करत आहेत. नक्षल्यांनी पोस्टर बॅनर लावून 28 जुलै ते 3 ऑगष्ट दरम्यान शहीद सप्ताह साजरा करण्याचे जनतेला आव्हान केले आहे.

शोषित समाजाच्या हितासाठी शासनाशी लढताना शहीद झालेल्या नक्षल चळवळीतील अमर योद्धयांच्या स्मृति जागृत ठेवत फासीवादी शासना विरुद्ध युद्ध पुकारण्यास सज्ज रहा, असाही उल्लेख पोस्टर तथा बॅनरमध्ये करण्यात आला आहे. दरवर्षी जुलै-ऑगष्ट दरम्यान माओवादी संघटनेकडून शहीद सप्ताह साजरा केला जातो. यावेळी माओवादी चळवळ स्थापनेपासून विविध घटनेत मारल्या घेलेल्या नक्षल्यांच्या स्मृति प्रीत्यर्थ दुर्गम भागातील जंगल परिसरात स्मारके उभारुण श्रद्धांजली कार्यक्रम घेतला जातो.

दुर्गम भागातील वाहतूक प्रभावित होत असून, नक्षली टार्गेटवर असणारे राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, पोलिस तसेच सामान्य नागरिकातील संशयित पोलिस खबरी अशा व्यक्तींची हत्या करण्याचा प्रयत्न नक्षल्यांकडून केला जातो. मात्र, पोलिस यंत्रणा सतर्क राहत नक्षल्यांना तोडीसतोड उत्तर देत आहे. पोलिसांकडूनही बॅनर पोस्टर लावून नक्षली अन्याय, अत्याचार व पिळवणुकी पासून नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन केले आहे. जनजागृती मेळावा, विविध कलाक्रीड़ा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन एटापल्लीसह तालुक्यातील गट्टा, हेडरी, बुर्गी, आलदंडी, हालेवारा, कसनसुर, कोटमी, जारावंडी इत्यादी पोलिस स्टेशन करण्यात आले असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले आहेत.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्यांसाठी क्लिक करा :

जेफ बेझोस ठरले जगात सर्वांत श्रीमंत 
कर्जमाफी की कर्जवसुली?
पंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच अधिक धनलाभ 
स्वार्थी नितीश कुमार यांनी दगा दिला- राहुल गांधी 
टोमॅटो विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट 
पुनर्गठित कर्जदारांनाही माफी - मुख्यमंत्री
लालूप्रसाद, राहुल यांना योग्य वेळी उत्तर देऊ: नितीशकुमार
राज्यातील 82 पेट्रोल पंपांत मापात पाप 
परराष्ट्रमंत्र्यांना खोटे ठरविण्याचा काँग्रेसचा अजेंडा: सुषमा स्वराज
मुजोर बॅंक अधिकाऱ्यांना धडा शिकवा - सुनील तटकरे 
काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या कळपात
महिला तस्करी रोखावीच लागेल - मुख्यमंत्री

Web Title: gadchiroli news police and moiast Poster war