भामरागडमधील गावांचा संपर्क तुटला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

गडचिरोली - सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्‍यातील शंभर गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. देसाईगंज व मुलचेरा तालुक्‍यात दोन जण पुरात वाहून गेल्याची माहिती आहे. 

भामरागडलगतच्या पर्लकोटा नदीला सोमवारी (ता. 17) रात्री पूर आला. पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने तेथील बाजारपेठ व घरे पाण्याखाली बुडाली आहेत. पुरामुळे परिसरातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. देसाईगंज येथे मासेमारी करण्यासाठी गेलेल्या विनोद शंकर कांबळे (वय 35) याचा नाल्याच्या पुरात वाहून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. मक्केपल्ली येथील ऋषी तुंकलवार (वय 60) हे मंगळवारी (ता.18) नाल्याच्या पुरात वाहून गेले. 

दरम्यान गोसेखुर्द धरणाचे 21 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. त्यातून 2126 क्‍युसेक पाणी सोडण्यात आल्याने प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. नदी-नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक मार्गांची वाहतूक ठप्प झाली आहे.

Web Title: gadchiroli news rain flood Parlakota River